अंगणवाडी सेविका Pudhari News Network
नाशिक

आनंदाची बातमी ! अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात होणार वाढ

Nashik News | महासभेच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेमार्फत चालविण्यात येणाऱ्या अंगणवाड्यांमधील मुख्यसेविका व प्रभारी सेविका, सेविका आणि प्रभारी सेविका तसेच मदतनीसांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. मुख्यसेविकांच्या मानधनात सातशे, सेविकांना पाचशे आणि मदतनिसांना तीनशे रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या अंगणवाड्यांच्या धर्तीवर नाशिक शहरात महापालिकेच्या माध्यमातून ३१० अंगणवाड्या चालविल्या जात आहेत. या अंगणवाड्यांमध्ये ५९९ कर्मचारी कार्यरत आहेत. सद्यस्थितीत पाच मुख्यसेविकांना प्रत्येकी ८५००, एका प्रभारी मुख्यसेविकेस ८१२० रुपये, २९९ अंगणवाडी सेविकांना ७६२०, तर सात प्रभारी सेविका व २८७ मदतनीस यांना प्रत्येकी अनुक्रमे साडेसात व सात हजार इतके मानधन दिले जाते. या माधनात वाढ करण्याबाबत २५ एप्रिल २०२५ रोजी आयुक्तांनी मंजुरी दिली असून, त्यानुसार मुख्यसेविका, प्रभारी मुख्यसेविकांच्या मानधनात दरमहा ७०० रुपये, सेविका व प्रभारी सेविकांच्या मानधनात ५०० रुपये, तर मदतनीसांच्या मानधनात ३०० रुपये वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. यापूर्वी ऑगस्ट २०२३ मध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात दोन हजार व १६०० रुपये अशी मोठी वाढ करण्यात आली होती.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर सव्वापाच कोटींचा खर्च

अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर दरमहा २९ लाख नऊ हजार, तर वर्षाला पाच कोटी २६ लाख ८६ हजार इतका खर्च होत आहे. त्यात आता वाढीव मानधनामुळे भर पडणार आहे. या वाढीव मानधनामुळे मासिक ८६ हजार १००, तर वार्षिक २९ लाख १९ हजार ६०० रुपये इतका खर्च महापालिकेला करावा लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT