गणेशोत्सवामुळे सलग चार दिवस सुट्टी pudhari file photo
नाशिक

आनंदाची बातमी ! शासकीय कर्मचार्‍यांसाठी उद्यापासून चार दिवस सलग सुट्टी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : सलग 4 दिवस सुट्ट्या आल्याने बँक कर्मचारी, विद्यार्थी अन् शासकीय कर्मचार्‍यांचा गणेश विजर्सनाचा आनंद द्विगुणीत होणार आहे. आज शुक्रवार (दि.13) रोजी कामकाजाचा शेवटचा दिवस असून शनिवारी (दि.14) साेमवारी (दि. 16) सलग तीन दिवस शासकीय तर मंगळवारी (दि.17) गणेश विसर्जन असल्याने सुट्टी आहे. त्यामुळे चौथ्या दिवशीच्या सुटीसाठी कर्मचार्‍यांनी अर्ज दिला आहे. (The joy of Ganesh Vijarsana of the government employees will be double)

शासकीय कर्मचार्‍यांना शनिवारपासून सलग 3 दिवस सुट्ट्या तर चौथ्या दिवशी गणेश विसर्जन असल्याने सुट्टीच्या काळात शासकीय कर्मचारी गावी जाण्याच्या तयारीत आहेत. शनिवारी (दि.14) रोजी नियमाप्रमाणे शासकीय सुटी तर रविवारी (दि.15) रोजी साप्ताहिक सुटी आहे. सोमवारी (दि.16) रोजी ईद-ए-मिलाद असल्याने सर्व शासकीय कार्यालयांना सार्वजनिक सुटी देण्यात आलेली आहे.

मंगळवारी (दि.17) रोजी पारंपरिक गणेशोत्सवाचा शेवटचा अकरावा दिवस असल्याने यादिवशी गणेश विसर्जन करण्यात येणार आहे. गणरायाच्या प्रतिष्ठापनेनंतर 4 दिवस गौरी गणपती असल्याने गणेश देखावे बघण्यासाठी अपेक्षित गर्दी होत नसल्याचे दिसून आले होते. गौरी गणपतीचा सण आटोपल्यानंतर गृहिणी काहीशा निवांत झाल्या असून गणेश देखाव्यांचा आनंद घेण्यासाठी दररोज सायंकाळी सहकुटूंब बाहेर पडत आहे. यामुळे सायंकाळच्या वेळेला शहर परिसरात गर्दी वाढली आहे. शेवटचे 4 दिवसही रात्री 12 पर्यंत गणेश देखावे बघण्यास प्रशासनाने परवागनी दिल्याने गणेश दर्शनाचा आनंद द्विगुणीत होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT