Gold Silver Rate PUDHARI PHOTO
नाशिक

Gold rate | सोने गडगडले, चांदीत १५ हजारांनी घसरण

सुवर्णनगरी जळगावात मोठी घसरण; २४ कॅरेट सोन्यात ३,५०० रुपयांनी घट, ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : 'सोनं गेलं आकाशाला आणि चांदी गेली ढगाला' अशा स्थितीत ग्राहकांसाठी गुरुवार (दि. २२) दिलासा देणारा ठरला. सुवर्णनगरीच्या सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरांनी मान टाकली. एकाच दिवसात २४ कॅरेट सोन्याचे दर ३,५०० रुपयांनी खाली आले, तर चांदीच्या भावात तब्बल १५,००० रुपयांची विक्रमी घसरण झाली.

लग्नसराईच्या तोंडावर भाव गडगडल्यामुळे ग्राहकांना काहीसा आधार मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून तेजीच्या लाटेवर स्वार झालेल्या सोन्याला गुरुवारी ब्रेक लागला. बुधवारी (दि. २१) सोन्याचे भाव उच्चांकी पातळीवर होते, मात्र आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि स्थानिक मागणीतील तफावत यामुळे गुरुवारी बाजार उघडताच दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. २४ कॅरेट सोने ४५०० नी, तर चांदीचे दर तर ३ लाखांच्या घरातून थेट खाली आले.

२४ कॅरेट सोने (प्रतितोळा / १० ग्रॅम)

२१ जानेवारी : १,५५,००० रुपये

२२ जानेवारी : १,५१,५०० रुपये

घसरण : ३,५०० रुपये

२२ कॅरेट सोने (दागिन्यांचे दर)

२१ जानेवारी : १,४१,९८० रुपये

२२ जानेवारी : १, ३८,७७४ रुपये

घसरण : ३,२०६ रुपये

चांदी (प्रतिकिलो)

२१ जानेवारी : ३,२३,००० रुपये

२२ जानेवारी : ३,०८,००० रुपये

घसरणः १५,००० रुपये

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT