Gold Silver Price Drop | सोने अडीच, चांदी 19 हजारांनी स्वस्त  Pudhari File Photo
नाशिक

Gold Silver Price Drop | सोने अडीच, चांदी 19 हजारांनी स्वस्त

सामान्यांना दिलासा; गुंतवणूकदार चिंतेत

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : दोन लाखांजवळ पोहोचलेल्या सोन्यात आणि चार लाखांचा टप्पा ओलांडलेल्या चांदीत घसरण सुरूच असून, शुक्रवारी (दि.13) सोने अडीच, तर चांदी तब्बल 19 हजारांनी स्वस्त झाली. जागतिक, आर्थिक, राजकीय आणि चलनविषयक घटकांच्या एकत्रित घडामोडींचा परिणाम सोने-चांदीच्या किंमतींवर होत असून, आणखी किंमती घसरण्याचा अंदाज असल्याने गुंतवणूकदार चिंतेत सापडले आहेत.

फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभापासून सोने-चांदीच्या किंमतीत तीव्र चढउतार दिसून येत आहे. गेल्या 29 जानेवारी रोजी 24 कॅरेट सोने प्रति तोळा जीएसटीसह 1 लाख 83 हजार 440 रुपयांवर होते. तर चांदी प्रति किलो जीएसटीसह 4 लाख 24 हजार 360 रुपयांवर होती. मात्र, फेब्रुवारी महिना सुरू होताच या दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये मोठी घसरण झाली असून, ती अजूनही कायम आहे.

गुरुवारचे दर (जीएसटीसह)

24 कॅरेट सोने - प्रति तोळा - 1,60,780 रु.

22 कॅरेट सोने - प्रति तोळा - 1,47,920 रु.

चांदी - प्रति किलो - 2,78,100 रु.

शुक्रवारचे दर (जीएसटीसह)

24 कॅरेट सोने - प्रति तोळा - 1,58,100 रु.

22 कॅरेट सोने - प्रति तोळा - 1,45,460 रु.

चांदी - प्रति किलो - 2,58,320 रु.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT