नाशिक : गोकुळाष्टमीनिमित्त कापड बाजार येथे पारंपरिक पद्धतीने श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करताना मान्यवर. 
नाशिक

Gokulashtami Krishna Janmashtami- 'नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की'

गोकुळाष्टमी : श्रीकृष्ण जन्मसोहळ्यानिमित्त श्रीकृष्ण मंदिरांमध्ये गर्दी, कृष्ण जन्मोत्सवानिमित्त जयघोष

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : गोकुळाष्टमीच्या निमित्ताने शहरातील विविध मंदिरांमध्ये शुक्रवारी (दि. ४) श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, 'गोविंदा रे गोपाळा', 'नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की'च्या जयघोषाने श्रीकृष्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला.

कृष्णजन्माच्या सोहळ्यासाठी भाविकांनी दर्शनासाठी सकाळपासूनच मंदिरांमध्ये गर्दी केली आहे. शहरातील प्रमुख कृष्ण मंदिरांसह विविध देवस्थानांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट आणि श्रीकृष्णाच्या बालरूपाच्या मूर्तीची आकर्षक आरास करण्यात आली आहे.

श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि शनिवारी (दि. ५) गोपाळकालानिमित्ताने दिवसभर भजन, कीर्तन, नामस्मरण आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि. ४) रात्री बारा वाजता कृष्णजन्माची वेळ होताच शंखनाद, घंटानाद आणि श्रीकृष्णाच्या जयघोषाने मंदिर परिसराचे वातावरण भक्तिमय झाले. कृष्णजन्मानंतर पाळणा सोहळा पार पडला. भाविकांनी श्रीकृष्णाच्या बालमूर्तीचे दर्शन घेत विशेष प्रसादाचे वाटप केले. अनेक मंदिरांमध्ये महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत पाळणा गीतांचे गायन केले.

लहान मुलांनी कृष्ण आणि राधेच्या वेशभूषेत सहभाग घेतल्याने उत्सवाला रंगला. दरम्यान, मंदिर परिसरात भाविकांची गर्दी लक्षात घेता स्वयंसेवक आणि पोलिसांकडून वाहतूक व गर्दी नियंत्रणाची व्यवस्था करण्यात आली. गोकुळाष्टमीमुळे नाशिकरोड, जेलरोड, पंचवटी, इंदिरानगर, राणेनगर, सिडको, गंगापूर रोड संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT