नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गंगापूर धरणातून थेंबभरही विसर्ग न करता बुधवारी (दि.८) गोदावरी नदीला मोठा पूर आला. पुराच्या पाण्याची पातळी मोजण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या रामतीर्थ परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी लागले होते. अशा प्रकारचा पूर १९२९ मध्ये आल्याचा अंदाज आहे. दरम्यान, गोदावरीला हंगामातील पहिला पूर ठरला आहे. १९४७ मध्ये ब्रिटिश राजवटीत गोदावरी नदीवर गंगापूर धरण उभारण्यास सुरुवात झाली.
पुढे १९६१ मध्ये ते कार्यान्वित करण्यात आले. गंगापूर धरणानंतर गोदावरीला अनेक मोठे पूर येऊन गेले. त्यातील सर्वात मोठा पूर २ सप्टेंबर १९६२ मध्ये आला होता. गंगापूर धरण आणि पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसानंतर मोठ्या प्रमाणात धरणातून विसर्ग केला गेला. सोबत पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाणी गोदा पात्रात आल्याने, गोदावरीने रौद्ररुप धारण केले होते.
होळकर पूल, गाडगे महाराज पूल पाण्याखाली गेले होते. देवमामलेदार मंदिर वाहून गेले होते. सरकारवाङधाची सातवी पायरी पाण्याखाली बुडाली होती. चार दिवस गोदेचे हे रौद्ररुप नाशिककरांना बघावयास मिळाले होते. त्यानंतर, १९७६ साली पुन्हा असाच गोदेला महापूर आला होता. पुढे २००८, २०१९, २०२५ मध्ये गोदावरी खळाळली. अर्थात हे सर्व पूर गंगापूर धरणातून केलेल्या विसर्गानंतर आले. तत्पूर्वी १९२९ मध्ये दमदार पावसामुळे गोदावरीला मोठा पूर आला होता.
पुरात दुतोंड्या मारुती बुडाला होता. धरण उभारेपर्यंत नंतरच्या काळातही गोदेला पुरसदृशस्थिती निर्माण झाली होती. १९२९ नंतर बुधवारी (दि.८) तब्बल २७ वर्षांनी गोदेला विनाविसर्ग पूर आल्याचे बोलले जात आहे. पुराचे पाणी दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पोहाचेले होते. याशिवाय रामसेतू पुलालाही पाण्याने स्पर्श केला. सायंकाळपर्यंत पूर ओसरला.
धरणे नसल्याने पूर्वी नदीला अशाच प्रकारे 66 पूर यायचे. ज्ञात इतिहासाप्रमाणे १९२९ मध्ये गोदावरीला मोठा पूर आला होता. नंतरच्या काळातही छोटे-मोठे पूर येऊन गेले. पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसाने अशा प्रकारचे पूर येतात अन् लगेचच ओसरतातही. मात्र, गोदावरीला सर्वात मोठा पूर १९६९ मध्ये आला होता. तेव्हा गोदेने रौद्ररुप धारण केले होते.- डॉ. कैलास कमोद, ज्येष्ठ अभ्यासक
घाटमाथ्यावर यलो अलर्ट, तर सहा तालुक्यांत अतिवृष्टीचा इशारा नाशिक: पुढारी वृत्तसेवा भारतीय हवामान खात्याकडून उपलब्ध माहितीनुसार नाशिक आपत्ती निवारण कक्षाकडून गुरुवारी (दि. ९) घाटमाथ्यावर 'यलो अलर्ट' जारी केला असून, पेठ, सुरगाणा, कळवण, सटाणा, त्र्यंबकेश्वर व इगतपुरीत या सहा तालुक्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी (दि.७) मध्यरात्रीपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाने झोडपले. बुधवार (दि. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यातील २० महसूल सर्कलमध्ये ६५ मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. यामध्ये त्र्यंबकेश्वर सर्कलमध्ये तब्बल ३२४.२५ मिमी पाऊस झाल्याने हा जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस ठरला.
तर, विनाविसर्ग न करता गोदावरी नदीला यंदाच्या पावसाळ्यातील पहिला पूर आला. पहाटेपासून सुरू झालेल्या संततधारेमुळे रामतीर्थ परिसरातील पाणीपातळी झपाट्याने वाढली असून, दुतोंडचा मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचले. दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे आतापर्यंत तीन जणांचे बळी गेले आहेत. दरम्यान, अतिवृष्टीमुळे सप्तशृंगीगड मंदिरही भाविकांसाठी तात्पुरते बंद ठेवण्यात आले असून, नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा आणि दिंडोरी या सहा तालुक्यांतील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे जलसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी व घाटमाथा परिसरात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने काही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्र्यंबकेश्वरला विक्रमी पाऊस जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.
बुधवारी (दि. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यातील २० महसूल सर्कलमध्ये ६५ मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. यामध्ये त्र्यंबकेश्वर सर्कलमध्ये तब्बल ३२४.२५ मिमी पाऊस झाल्याने हा जिल्ह्यातील सर्वाधिक विक्रमी पाऊस ठरला. त्र्यंबकेश्वर तालुक्यात त्र्यंबकेश्वर ३२४.२५ मिमी, वेलुंजे २७५.४० मिमी, ठाणापाडा २४४.७५ मिमी आणि हरसूल २२५.७५ मिमी अशी अतिमुसळधार पावसाची नोंद झाली. त्यामुळे डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा धोका वाढला असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
शहर परिसरातही जोर कायम राहिला. नाशिक आणि पाथर्डी सर्कलमध्ये प्रत्येकी २९ मिमी, तर देवळाली येथे ९४.२५ मिमी पावसाची नोंद झाली. सातपूर व गिरणारे येथे प्रत्येकी ६९.७५ मिमी, तर मडसांगवी येथे ६६.५० मिमी पाऊस झाला. निफाड तालुक्यात ओझर येथे १०९, तर चांदोरी येथे ६६.५० मिमी पावसाची नोंद झाली. इगतपुरी तालुक्यात वाडीव-हे, नांदगाव आणि टाकेद या तिन्ही सर्कलमध्ये प्रत्येकी ७१.५० मिमी पाऊस झाला. सिन्नर तालुक्यात देवपूर व पांगरी बुटुक येथे प्रत्येकी ७५.२५ मिमी, तर कळवण तालुक्यात कळवण येथे ६६.७५ आणि अभोणा येथे ६५.२५ मिमी पाऊस झाला. पेठ तालुक्यातील जोगमोडी येथे ६५.५० मिमी पावसाची नोंद झाली.
विसर्ग सुरू, धरणसाठ्यांत वाढ
जिल्ह्यातील २६ धरणांमध्ये २४ हजार ७७१ दशलक्ष घनफूट (दलघफू) पाणीसाठा असून, तो एकूण क्षमतेच्या ३५.०८ टक्के आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ५७.५२ टक्के होता. जिल्ह्यातील सात मोठ्या धरणांमध्ये ५१.६० टक्के, तर १९ मध्यम प्रकल्पांमध्ये २१.६० टक्के पाणीसाठा आहे. सध्या नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून ६,३१० क्यूसेक, चणकापूर धरणातून ४,७३२ क्यूसेक आणि गौतमी गोदावरी धरणातून १,२८० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुख्य धरणांपैकी गंगापूरुमध्ये ५३.३४ टक्के, दारणा ३५.९५ टक्के, कड़वा ४९.६४ टक्के, भावली ७२.६६ टक्के, हरणबारी ६०.८१ टक्के आणि चणकापूर ६०.२० टक्के पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे. तर नांदूरमधमेश्वर बंधारा ८४.०५ टक्के भरला असून, त्यातून नियंत्रित विसर्ग सुरू आहे.
66 भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आपत्ती निवारण कक्षाला सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. धोक्याच्या ठिकाणी जाणे टाळण्या-सोबतच विविध ठिकाणी होणारी गर्दी टाळून नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे.- आयुष प्रसाद जिल्हाधिकारी