महावितरणचा अभियंता यग्नेश पवार हा गाेदावरीला पूर आल्याने पात्रातील पाण्यात वाहून गेला होता. pudhari news network
नाशिक

Godavari Flood News Update | आईसमोर गोदापात्रात वाहून गेलेल्या मुलाचा मृतदेह आढळला

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : गोदाघाटावर पूजा करताना पाय घसरून पुरात वाहून गेलेल्या अभियंत्याचा मृतदेह माडसांगवी येथे मंगळवारी (दि. ६) आढळून आला.

स्थानिकांना पाण्यात तरंगताना मृतदेह आढळला. यग्नेश पवार (२९, रा. ओझर) असे या अभियंत्याचे नाव आहे. रविवारी (दि. ४) तो पाण्यात पडला होता. कालसर्प याेगाची पूजा करण्यासाठी यग्नेश हा सहपरिवार आला होता. पूजा करताना पाय घसरून पडल्याने तो गाेदापात्रात वाहून गेला. त्याचे शोधकार्य राबवण्यात आले, मात्र, शोध लागला नाही. मंगळवारी (दि. ६) माडसांगवी येथे यग्नेशचा मृतदेह आढळून आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT