नाशिक

Goda Mahaarti Nashik : गोदा महाआरतीचा वाद अधिक चिघळणार

अंजली राऊत

नाशिक: पुढारी वृत्तसेवा

दक्षिणवाहिनी गोदावरी नदीच्या महाआरतीवरून सुरू असलेल्या बादात दिवसेंदिवस भर पडत आहे. गोदा महाआरतीसंदर्भात पंचवटीमध्ये सोमवारी (दि. १२) ग्रामसभा बोलाविण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

वाराणसी, हरिद्वारच्या धर्तीवर गोदावरीच्या भव्यदिव्य महाआरतीसाठी राज्य शासनाने ११ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून रामकुंड परिसरात आरतीसाठी सोयी-सुविधा उभारण्यात येणार आहेत. परंतु, शासनाकडून हा निधी येण्यापूर्वीच त्यावरून वादाची ठिणगी पडली आहे. महाआरतीसाठी शासनाने रामतीर्थ गोदा सेवा समिती स्थापन केली आहे. पण, ही समिती पहिल्या दिवसापासून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यातही गेल्या १५

• पंचवटीमध्ये आज ग्रामसभा
दिवसांपासून समाजाच्या सर्वच स्तरांमधून समितीच्या मनमानी कारभाराविरोधात तीव्र भावना उमटत असताना शासनाने मंजूर केलेल्या निधीवरून वाद अधिक विकोपाला गेला आहे. गोदा महाआरतीच्या वादावरून सोमवारी (दि. १२) पंचवटीमधील लेवा पाटीदार मंगल कार्यालय येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या सभेला महंत राम किशोरदास शास्त्री महाराज, महंत भक्तिचरणदास महाराज, अनिकेतशास्त्री देशपांडे, माजी आमदार बाळासाहेब सानप, सुधीर पूजारी, नंदकुमार मुठे, कल्पना पांडे आदी उपस्थित राहणार आहेत. सभेमध्ये शासन स्थापन समितीबाबत विरोधाची धार तीव्र होण्याची शक्यता असल्याने ग्रामसभेकडे लक्ष लागले आहे.

रामकुंड येथे अनादी काळारा पुरोहित संघ धार्मिक विधी पार पाडत आहे. गंगा गोदावरी पंचकोठी संस्था नावाने १९५ साली संस्थेचे नोंदणी आहे. गोदा महा आरतीसंदर्भात सोमवारी प्रामसभा आयोजित करण्यात आली आहे. आरतीबाबत पुरोहित संपाच्य भूमिकेला समाजाच्या विविध स्तरांतून तसेच सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. – सतीश शुक्ल, अध्यक्ष, गंगा गोदावरी पुरोहित संघ, नाशिक.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT