Goa Water Sports 
नाशिक

Goa Water Sports | गोव्यात जलक्रीडा चालकांचा मनमानी कारभार; 2 वर्षांत 23 वेळा नियमांचे उल्लंघन!

Goa Water Sports | दंडापोटी १.०६ लाख रु. वसूल; बंदर कप्तान खात्याकडून कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील किनारी भागात गेल्या २ वर्षांत जलक्रीडा नियमांचे २३ वेळा उल्लंघन झाले व त्यांच्याकडून दंडापोटी १.०६ लाख रु. वसूल करण्यात आले. बंदर कप्तान खात्याच्या अधिकृत अंमलबजावणीच्या नोंदीनुसार, गोव्यातील नियमांचे पालन न करणाऱ्या किनारी जलक्रीडा चालकांशी संबंधित २३ घटना दोन वर्षांत घडल्या, ज्यात अपघात आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून येते. याबाबत जागेवर दंड, पोलिस प्रकरणे आणि परवान्यांचे निलंबन यापोटी १.०६ लाख रुपये दंडापोटी वसूल करण्यात आले.

अधिकृत आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये १२ उल्लंघने नोंदवली गेली, ज्यात प्रामुख्याने वैध बोटी चालवण्याचा परवाना नसताना बोटी चालवणे, बोटीच्या नोंदणीची कागदपत्रे नसणे किंवा प्रवाशांना जीवनरक्षक जॅकेट न पुरवणे यांसारख्या ऑपरेटरचा समावेश होता. २०२४ मध्ये ११ घटनांची नोंद झाली, ज्यामध्ये इतर सुरक्षा समस्यांसोबतच, ऑपरेटरनी नेमून दिलेल्या कार्यक्षेत्राबाहेर काम करणे हे एक प्रमुख उल्लंघन म्हणून समोर आले. बागा येथे बोट कॅप साईझिंगच्या दोन अपघातांनंतर बंदर कप्तान खात्याने पर्यटन खात्याच्या सहकार्याने कारवाई केली.
समुद्रकिनाऱ्यावर, बोट उलटण्याच्या घटनेमुळे शापोरा किनारी सुरक्षा पोलिसांकडे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. कळंगुट बीचवर, बोट उलटण्याच्या घटनेमुळे प्रशासकीय कारवाई करण्यात आली आणि ऑपरेटरचे ना-हरकत प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले. गोवा कॅनचे समन्वयक रोलंड मार्टिन्स याबाबत म्हणाले की, गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या पर्यटन कार्यक्रमात जलक्रीडा हा एक महत्त्वाचा भाग आहे. जगप्रसिद्ध समुद्रकिनारी पर्यटनस्थळ असल्याने, पर्यटन विभागाने पर्यटकांची सुरक्षा सुनिश्चित करून जलक्रीडा व्यवसायाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

नियम, धोरणे बनवण्याची गरज

अंतर्देशीय जहाज कायदा, २०२१ अंतर्गत, कॅप्टन ऑफ पोर्ट्स विभाग अनिवार्य वार्षिक आणि नियतकालिक तपासणी करतो. सागरी सर्व्हेक्षक जहाजाची सागरी योग्यता, प्रवासी विमा संरक्षण, जीवनरक्षक जॅकेट्स, अग्निशमन उपकरणे आणि प्रमाणित साधनांची तैनाती यांची पडताळणी केल्यानंतर योग्यता प्रमाणपत्रे जारी केली जातात किंवा त्यांचे नूतनीकरण केले जाते. याचे कायदेशीररित्या संचालन करता यावे यासाठी नियम आणि धोरणे तयार केली पाहिजेत, असे ते म्हणाले.

ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत मानकांची मागणी

मार्टिन्स म्हणाले की, ग्राहक संरक्षण कायदा २०१९ अंतर्गत पर्यटकांना ग्राहक म्हणून वागणूक देण्याचे महत्त्व वारंवार मांडले आहे. त्यांनी खात्याला विमा संरक्षण, आपत्कालीन सुरक्षा सेवा, तक्रार निवारण आणि इतर बाबींचा समावेश असलेली एक सर्वसमावेशक मानक कार्यप्रणाली लागू करण्याचे आवाहन केले. ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवाचे माजी अध्यक्ष जॅक सुखीजा म्हणाले की, काही बेकायदेशीर व्यावसायिक पुरेशा सुरक्षा उपकरणांशिवाय व्यवसाय करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT