हाॅल ऑफ फेम
हाॅल ऑफ फेम  file photo
नाशिक

गौरवशाली ! 'नासा' कडून नाशिकचे विदयार्थी सन्मानित

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : सायबरच्या प्रशिक्षणामध्ये घेतलेल्या वर्गानुसार नाशिकच्या ४० विद्यार्थ्यांनी 'नासा' या अमेरिकन संस्थेसाठी सायबर सुरक्षाविषयक संशोधन सादर केल्याबद्दल 'नासा'च्या सुरक्षा विभागातर्फे नाशिकच्या ५० विद्यार्थ्यांचा 'हॉल ऑफ फेम' ने सन्मानाने गौरव करण्यात आला.

सायबर सुरक्षा तज्ज्ञ नेहमीच मोठ्या संस्थांमधील 'डेटा'वरती 'हॅकिंग'चे संकट येत असेल तेव्हा आणि त्याचे संरक्षणार्थ मार्गदर्शन अशा संस्थांना करत असतात. याच धर्तीवर 'सायबर संस्कारा'ने यंदा तन्मय दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातून दहावी ते इंजिनिअरिंग शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणार्थींनी 'नासा' संस्थेला सायबर सुरक्षेसंबंधी संशोधन सादर केले. या कार्याबद्दल ५० विद्यार्थ्यांचा 'नासा'तर्फे 'हॉल ऑफ फ्रेम' या सन्मानाने गौरव करण्यात आला. आजवर नासा येथून जगभरात १५०० जणांना हा पुरस्कार मिळालेला आहे.

'या' संस्थांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था; मविप्र कर्मवीर बाबुराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालय; डॉन बॉस्को हायस्कूल, ब्रह्मा व्हॅली कॉलेज ऑफ टेक्निकल एज्युकेशन, संदिप पॉलिटेक्निक, राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक, के. के. वाघ पॉलिटेक्निक कॉलेज. एमईटी भूजबळ नाॅलेज सिटी पॉलिटेक्निक काॅलेजमधील विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला.

सायबर सुरक्षा या क्षेत्रात जागतिक स्तरावर विपूल संधी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे यासाठी दहावी उत्तीर्ण विद्यार्थी देखील सुरक्षेचे शिक्षण, प्रशिक्षण घेऊन यात यशस्वी होऊ शकतो.
तन्मय दीक्षित, सायबर सुरक्षा तज्ज्ञ. नाशिक.
SCROLL FOR NEXT