नाशिकमधील पाच उद्योजकांची निवड pudhari news network
नाशिक

गौरवास्पद! जर्मनीतील प्रशिक्षणासाठी नाशिकमधील पाच उद्योजकांची निवड

पुढारी वृत्तसेवा

सिडको : औद्योगिक संबंध अधिक वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने भारत आणि जर्मनी सरकार यांच्यात झालेल्या करारानुसार तसेच अंबड इंडस्ट्रिज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) आणि सीआयआयच्या पुढाकाराने नाशिकमधील पाच होतकरू उद्योजकांची जर्मनी येथील १५ दिवसांच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली असून, हे उद्योजक नुकतेच तेथे रवाना झाल्याची माहिती आयमाचे अध्यक्ष ललित बूब यांनी दिली. (Glorious! Five budding entrepreneurs from Nashik were selected for 15 days training in Germany)

प्रशिक्षणासाठी निवड झालेल्यांमध्ये ललित देशमुख, अजय यादव, शिवानी गोपाळे, रोहित साठे आणि संकेत कोठावदे यांचा समावेश आहे. १५ दिवस या सर्वांना प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळणार असून, वर्षभर त्याचे हँडहोल्डिंग होणार आहे. प्रशिक्षणासाठी देशभरातून २२ उद्योजकांचा समावेश आहे. नाशिकमधील ९ जणांनी यासाठी अर्ज केले होते.

मुलाखतीनंतर त्यातून पाच जणांची निवड झाली. २००९-१० पासून हा उपक्रम सुरू झाला असून, आत्तापर्यंत जर्मनीतील प्रशिक्षणासाठी देशभरातून ६५० होतकरू उद्योजकांनी याचा फायदा घेतला असून, त्यात ४२ नाशिकचे आहेत.

प्रशिक्षण दौरा कार्यक्रमांतर्गत हे होतकरू उद्योजक सर्व प्रशिक्षणाबरोबरच जर्मनीतील विविध कंपन्यांना भेटी देऊन तेथील उद्योग, नवीन तंत्रज्ञानाची माहिती अवगत करतील. विविध प्रदर्शनांनाही ते भेटी देतील, असे देवेंद्र विभुते यांनी नमूद केले. होतकरू उद्योजकांना मार्गदर्शन करताना आयमाचे सरचिटणीस प्रमोद वाघ, चिटणीस योगिता आहेर उपस्थित होते

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT