पंचवटी: पंचवटी कारंजा शिवतीर्थ येथे लोकार्पण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा  (छाया : गणेश बोडके)
नाशिक

Girish Mahajan | शिवरायांचे शौर्य, प्रामाणिकपणा सर्वांनी अंगी बाळगावा

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे आवाहन, महाराजांचा पुतळ्याचे शिवतीर्थावर लोकार्पण

पुढारी वृत्तसेवा

पंचवटी : पंचवटीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवतीर्थाचे लोकार्पण माझा हाताने होत आहे. याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. शिवजन्मोत्सवाच्या मंगळवार (दि.18) पूर्वसंध्येला हा कार्यक्रम होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तव्य, शौर्य, प्रामाणिकपणा हे गुण सर्वांनी अंगी बाळगावे. त्यांचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवतीर्थ लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक शहराची ओळख सर्वत्र आहे. स्मारक उभे राहिले. महापुरुषांच्या जयंती साजरी केली जाते. त्यांनी समाज प्रबोधनाचे काम केले आहे. इतर देशातील लोक देशप्रेमाने झपाटले आहे, राष्ट्रप्रेमाने झपाटले आहेत. त्याच प्रमाणे आपण महापुरुषांचा आदर्श घ्यावा. सर्वांनी निर्व्यसनी राहावे, असा संकल्प करावा, असेही यावेळी सांगितले.

आमदार ढिकले यांनी मनोगत व्यक्त केले. लोकार्पण होताच छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले. गुरुमित बग्गा यांनी प्रास्ताविक केले. ज्ञानेश्वर बोडके यांनी आभार मानले.

यावेळी आमदार राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, माजी खासदार डॉ. प्रतापराव वाघ, माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी नगरसेविका विमल पाटील, नंदिनी बोडके, कैलास जाधव, कैलास कमोद, उद्धव निमसे, लक्ष्मण सावजी, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पंचवटी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष तुषार नाटकर, कार्याध्यक्ष हर्षल पवार यांसह असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT