घोटी: घोटी शहरात गेल्या महिनाभरापासून निळक नसल्याने माजी जिल्ला परिषद सदस्या अलका जाधव, भावष महिला तालुकाप्रमुख दीपा राय कंदकुरीवार पांच्या नेतृत्वाखाली संतम झालेल्या शेकडो महिलांनी बुधवारी (दि. २) ग्रामपालिकेतर हंदा मोर्चा काढला. ग्रामपालिकेसह महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
घोटी ग्रामपालिकेच्या दिसाळ कारभाराने नागरिक त्रस्त झाले असून, संपूर्ण तालुक्यात मुसळधार पाऊस होऊनही पिणास पागी मिळत नसल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. वीजपुरवठा विस्कळीत असल्याने पाणीपुरवठा करू शकत नसल्याचे ग्रामपालिका अधिकान्यांनी सांगितले. महिलांनी तात्काळ महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना ग्रामपालिकेत बोलावून जाब विचारला दोन्ही विभागांनी नियोजन करून आम्हाला पिण्यास पाणी घारे, असा आत भरल्याने तब्बल २ तास चर्चा झडली. पाणी वितरणा करणाऱ्या भागातील ट्रान्नममिरचा बीजपुरवठा खंडित होणार नाही, असे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आश्वस्त केल्यानंतर आंदोलन शमले.
घोटी ग्रामपालिकेच्या वतीने ग्रामविकास अधिकारी बाजीराव डांग, प्रशासक ज्ञानेश्वर कराळे, महावितरण अधिकारी माळी, सरोदे यांनी महिलांना सुरळीत यौन व पाणीपुरवठ्याचे आश्वासन दिले. माजी पंचायत समिती सदस्य अष्णा पचार, महेत शहाणे, दीपक सास्त्राला, राकेश परचुरे, किरण कडवे, केतन विसपुते, संजय जाधव, नीलेश जोशी, मोगेश क्षीरसागर यांनी ग्रामपालिकेच्या मनमानी कारभाराबाबत प्रश्न उपस्थित केले. यावेळी शिवानी दासूद, गायत्री पवार, संगीता जाधव, प्रतिभा जाळे, अनिता विचा, संगीता शिरसाठ, सुनीता सिथल, चैवाली विसपुते, वैशाली दुर्गुड, जागृती वालझाडे आदीसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
जवळपास तीस हजारावर लोकसंख्या असलेल्या पोटी शहराला गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेदसायत आहे. गेल्या वर्षभरात हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे जलजीवन म्मिसात योजनेच्या कामावावत दिरंगाई होत असल्याने महिलांसह सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब साखाला यांनी उठाव केला. मात्र, अद्यापही कार्यवाही झालेली नाही.
भर पावसाळ्यात पोटीकरांना टोकाद्धारं पाणी विकत घ्यावे लागत आहे. याबाबत जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन व ग्रामपालिका प्रशासन सध्याची भूमिका का घेते, असा प्रश्न संतप्त महिलांनी उपस्थित केला. पावसाळ्याचे दिवस असल्याने साथीचे आजार पसरण्याची भीती आहे. त्यामुळे शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.