मालेगाव : चिखलओहळ येथील मोहंमद इसराईल मोहंमद इद्रीस (३९) याचा मृतदेह १० सप्टेंबरला राहत्या घरी गॅस सिलिंडर स्फोटात अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला होता. त्याचा पुतण्या मोहंमद इसराज मो. इसराईल याने औषधोपचारासाठी मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात नंतर धुळे येथील मेडिकल कॉलेजमध्ये त्यांना उपचारार्थ दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना १७ सप्टेंबरला डॉ. श्रीनिवास यांनी तपासून मृत घोषित केले. तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हवालदार फुलमाळी अधिक तपास करीत आहेत.