सिडको : खुटवडनगरनगर येथे आयटीआय पूल ते वावरेनगर रस्त्याच्या काँक्रिटीकरण भूमिपूजनप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करताना आमदार सीमा हिरे, महेश हिरे, अलका आहिरे, कैलास आहिरे आदी. (छाया : राजेंद्र शेळके)
नाशिक

विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नाही | CM Eknath Shinde

Nashik : आयटीआय पूल- वावरेनगर रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन

पुढारी वृत्तसेवा

सिडको : महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जोरात सुरू आहे. आमदार सीमा हिरे याही आमची लाडकी बहीण असून, त्या मतदारसंघात राबवत असलेल्या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

आयटीआय पूल ते वावरेनगर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन खुटवडनगर येथे झाले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दादा भुसे, आमदार सीमा हिरे, राहुल ढिकले, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, माजी नगरसेविका अलका आहिरे, माजी नगरसेविका सुवर्णा मटाले, छाया देवांग, भाग्यश्री ढोमसे आदी उपस्थित होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सीमा हिरे यांच्या विकासकामांचे कौतुक केले.

मुख्यमंत्री शिंदे भाषणात म्हणाले की, या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला आमदार सीमा महेश हिरे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे निधी मंजूर झाला. या प्रकल्पामुळे वावरेनगर आणि त्याबरोबरच्या परिसरातील रहिवाशांना वाहतूक सोयीसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्याने वाहनचालकांना सुरक्षितता मिळेल. तसेच या कामामुळे संपूर्ण परिसराचा विकास होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आमदार सीमा हिरे यांनी भाषणात, या प्रकल्पामुळे परिसरात सकारात्मक बदल घडेल. तसेच वाहतूक कोंडी कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी भाजपचे अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवक उपस्थित होते.

कार्यक्रम सुरू असताना पावसाचे आगमन झाले. परंतु भाजप, शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक छत्री घेऊन उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT