माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन  file
नाशिक

माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन

Harishchandra Chavan passed away |

गणेश सोनवणे

पुढारी ऑनलाइन: दिंडोरी लोकसभा माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. पार्थिव अंत्यदर्शनासाठी पाटील गल्ली क्रं.४ कॉलेज रोड, नाशिक या त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलेले आहे.

मालेगाव आणि नंतर दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे खासदार म्हणून त्यांनी अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले. पंचायत समिती, जिल्हा परिषद, येथेही त्यांनी पदे भूषवली. दिंडोरीचे खासदार असताना भाजपचे सरकार वाचवण्यासाठी एयर अॅब्युलन्स ने दिल्ली येथे ते गेले होते. भाजपशी एकनिष्ठ असलेले चव्हाण यांना 2019 च्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने तिकीट दिले नव्हते, मात्र तरीही ते भाजपात राहून काम करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी कलावती चव्हाण, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

भाजपने नाकारली होती उमेदवारी

हरिश्चंद्र चव्हाण यांनी २००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. २०१४ मध्ये त्यांनी विद्यमान खासदार भारती पवार यांचा २ लाख ४७ हजार मतांनी पराभव केला होता. भारती पवार त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढल्या होत्या. दरम्यान, २०१९ मध्ये भारती पवार भाजपामध्ये आल्या. त्यानंतर भाजपाने हरिश्चंद्र पवार यांची उमेदवारी नाकारून भारती पवार यांना उमेदवारी दिली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भारती पवार यांनी १ लाख ९८ हजार ७७९ मतांनी विजय मिळवला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT