माजीमंत्री छगन भुजबळ यांचा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना टोमणा File
नाशिक

Chhagan Bhujbal | हवेत बाण नको, विनाकारण राजकीय विधाने अयोग्य

Chhagan Bhujbal on Jayant Patil | माजीमंत्री भुजबळ यांचा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना टोमणा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेवर त्यांना गोवण्याचा प्रयत्न झाला. ३० वर्षांपूर्वीच्या प्रकरणावर अचानक कशी सुनावणी झाली. यामागे काहीतरी राजकारण असावे, असे वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाटे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी समाचार घेतला आहे. एखाद्या प्रकरणात राजकीय विधान करण्यापूर्वी विचारपूर्वक करावे. काही ठोस माहिती हाती असेल तरच बोलावे, असे संकेत आहेत. हे संकेत मोडणे योग्य नाही. हवेत बाण मारण्याऐवजी जयंत पाटील यांच्याकडे काही ठोस पुरावे असल्यास ते त्यांनी सादर करावेत. विनाकारण राजकीय विधाने करणे अनुचित आहे, असा टोमणा भुजबळ यांनी पाटील यांना लगावला आहे.

भुजबळ गुरूवारी (दि. २७) नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मंत्री कोकाटे यांच्याबाबत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर विचारले असता ते म्हणाले, एखाद्या प्रकरणात राजकीय विधान करण्यापूर्वी विचारपूर्वक करावे. काही ठोस माहिती हाती असेल तरच बोलावे, असे संकेत आहेत. हे संकेत मोडणे योग्य नाही. पाटील हे शरद पवार यांच्याबरोबर राहतात. त्यांच्याकडून काही गोष्टी त्यांनी शिकल्या पाहिजेत. कुठल्या विषयावर केव्हा आणि काय बोलावे, हे संकेत जयंत पाटील यांनी पाळायला हवेत, असा टोमणा पाटील यांनी मारला.

पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत. ते एका पक्षाचे प्रदेशाध्यक्षदेखील आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलेले आहे. त्यामुळे मला काही गोष्टी समजतात. हवेत बाण मारण्याऐवजी काही ठोस पुरावे असल्यास ते त्यांनी सादर करावेत. विनाकारण राजकीय विधाने करणे अनुचित आहे, असेही भुजबळ यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT