लासलगाव ( नाशिक ) : राकेश बोरा
जगात डाळींचा सर्वांत मोठा उत्पादक व निर्यातदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताने एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या ११ महिन्यांच्या कालावधीत सहा लाख १७ हजार ९७० मेट्रिक टन डाळी निर्यात करत पाच हजार ६५० कोटी रुपयांचे परकीय चलन मिळविले आहे. ही आकडेवारी केवळ उत्पादनक्षमताच नव्हे तर देशाच्या अन्न धोरणात बदलाचेही सूचक ठरत आहेत.
भारत हा डाळींचा सर्वांत मोठा उत्पादक देश असून, २०२२ मध्ये देशाने २५ दशलक्ष मेट्रिक टनांहून अधिक डाळींचे उत्पादन घेतले होते. हे जागतिक उत्पादनाच्या जवळपास २५ टक्के आहे. याचबरोबर, भारत हा डाळींचा सर्वांत मोठा ग्राहकही आहे. देशातील आहार संस्कृती, शाकाहारी लोकसंख्या आणि आरोग्य जागरूकता यामुळे डाळींची मागणी मोठ्या प्रमाणावर असते. डाळ उत्पादनात राज्यनिहाय मध्य प्रदेशचा २५ टक्के वाटा असून, महाराष्ट्राचा १७ टक्के वाटा आहे. या उत्पादनाचा काही भाग देशांतर्गत वापरासाठी राखून ठेवला जातो, तर उरलेला मोठा हिस्सा परदेशी बाजारपेठेत निर्यात केला जातो.
मसूर, हरभरा, वाटाणे, उडीद, मूग आणि सोयाबीन यांसारख्या डाळींमध्ये प्रथिने, फायबर, लोह, जस्त आणि विविध जीवनसत्त्वे आढळतात. आरोग्य ट्रेंडनुसार, वनस्पती आधारित प्रथिनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. ग्लूटेन- मुक्त, लो कार्ब आणि पर्यावरणपूरक आहार निवडणाऱ्यांसाठी डाळी आदर्श पर्याय मानल्या जात आहेत.
२०२०-२१ : २ लाख ७६ हजार ८६३
२०२१-२२ : ३ लाख ८८ हजार ४०३
२०२२-२३ : ७ लाख ६२ हजार ८५२
२०२३-२४ : ५ लाख ९४ हजार १६४
२०२०-२१ : १९७७
२०२१-२२ : २६८०
२०२२-२३ : ५३१२
२०२३-२४ : ५३३३
वनस्पती आधारित प्रथिनांबद्दल जागरूकता, शाश्वत शेती व पर्यावरणपूरक आहाराची निवड, वाढती शाकाहारी लोकसंख्या. भारतीय डाळींची गुणवत्ता.