नाशिक: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये महापालिकेने यंदा ३० ठिकाणी ३०१ फटाके विक्री स्टॉल्स उभारण्यास परवानगी दिली असून त्यापैकी १५१ स्टॉल्सचा लिलाव गत सप्ताहात पार पडला.
सर्वाधिक बोली ५७ हजार रुपये (सिडको विभाग) पर्यंत गेली तर किमान बोली २५ हजार ७०० रुपये (नाशिकपूर्व विभाग) नोंदवली गेली. प्रत्येक स्टॉलसाठी ३ हजार रुपये स्वच्छता शुल्क आणि दररोज ५०० रुपये फायर चार्जस निश्चित करण्यात आले आहे. सुरक्षेच्या नियमांनुसार, प्रत्येक स्टॉलमधील अंतर ३ मीटरपेक्षा कमी नसावे, तसेच एक ठिकाणी ५० पेक्षा अधिक स्टॉल ठेवण्यास बंदी आहे.
विभागनिहाय स्टॉल्सचे वाटप
पंचवटी विभाग: ६९ स्टॉल्स
नाशिकरोड विभाग: ६९ स्टॉल्स
पश्चिम विभाग: ६० स्टॉल्स
सातपूर विभाग: ५१ स्टॉल्स
सिडको विभाग: ३६ स्टॉल्स
पूर्व विभाग :१६ स्टॉल्स