FDA Action Balaji Ladoo 
नाशिक

FDA Action Balaji Ladoo | 'बालाजी लाडू'वर 'एफडीए'ची कारवाई

FDA Action Balaji Ladoo | निकृष्ट दर्जा, अतिरिक्त अन्नरंग वापरण्याचा संशय, नोंदणी प्रमाणपत्र निलंबित

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
श्री बालाजी लाडू या आस्थापनेत गुरुवार (दि. ५) तपासणी करून २५८ किलो मोतीचूर लाडूंचा साठा जप्त करण्यात आला. या साठाची किंमत सुमारे ६४ हजार ५०० रुपये आहे. लाडूंची निर्मिती व साठवणूक अस्वच्छ वातावरणात होत असल्याचे आढळले. तसेच लाडूंमध्ये विहित मर्यादेपेक्षा अधिक अन्नरंग वापरल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या गंभीर त्रुटींच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संबंधित आस्थापनेचे नोंदणी प्रमाणपत्र तत्काळ निलंबित केले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या सण-उत्सव विशेष मोहीम २०२६ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. वडनेर गेट परिसरातील शिवाजी पुतळ्याजवळ असलेल्या मे. श्री बालाजी लाडू या आस्थापनेची अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी तपासणी केली. यावेळी मिठाईचे उत्पादन आणि साठवणुकीसाठी आवश्यक स्वच्छतेचे निकष पाळले जात नसल्याचे निदर्शनास आले.

तयार करण्यात येणारे मोतीचूर लाडू संशयित निकृष्ट दर्जाचे असल्याचेही आढळले. त्यात अन्नरंगाचा अतिवापर होत असल्याचा संशय असल्याने प्रशासनाने संबंधित लाडूंचा संपूर्ण साठा जप्त केला. अन्नपदार्थांच्या गुणवत्ता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाकडून जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. अन्नसुरक्षा मानकांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. अन्नसुरक्षा अधिकारी वैभव गर्दे आणि श्रद्धा राहिंज यांनी तपासणी व जप्तीची प्रक्रिया पूर्ण केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT