नाशिक : शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार डॉ. राजश्री अहिरराव यांचे स्वागत करताना मतदार. Pudhari
नाशिक

देवळाली मतदारसंघाच्या विकासासाठी प्रत्येक पाऊल ; शिंदे गटाच्या डॉ. अहिरराव यांची ग्वाही

Deolali Assembly Election | मतदारांचा पाठिबा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : देवळाली मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार डॉ. राजश्री अहिरराव यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. मतदारसंघातील गावागावांमध्ये त्यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात येत असून प्रचार रॅलीला मतदारांचा भरघोस पाठिंबा लाभतो आहे. देवळालीच्या विकासासाठी आपले प्रत्येक पाऊल असेल, अशी ग्वाही अहिरराव मतदारांना देत आहेत. तहसिलदारताईंच्या रुपाने पर्याय उपलब्ध झाला आहे. यंदा परिवर्तन घडवायचे आहे असा निर्धार मतदार व्यक्त करत आहेत.

नाशिकच्या तहसिलदार असताना डॉ. राजश्री अहिरराव यांनी आपल्या कामातून जनतेत वेगळा ठसा ऊमटविला. त्यामुळे जनतेमधील अधिकारी असा नावलौकिक त्यांनी प्राप्त केला. यानिमित्ताने देवळाली मतदारसंघातील गावागावांत भेटी देताना जनतेच्या अडचणी समजावून घेत त्या दुर करण्याचे कार्य केले. त्यांच्याकडे कोणतेही काम घेऊन गेले की, मार्ग निघणार असा अनुभव असल्याने जनतेमध्ये अहिरराव या हक्काच्या 'तहसीलदारताई' म्हणून लोक्रपिय ठरल्या. देवळाली च्या विकासाकरीता प्रशासकीय कामाचा अनूभव व्हावा या उद्देशाने जनतेने त्यांना निवडणूक लढण्याचा आग्रह केला. त्यानूसार गावागावांमध्ये निघणाऱ्या प्रचार रॅलीतून तहसीलदारताईंना पाठिंबा मिळतो आहे.

एकलहरे, हिंगणवेढे, गंगापाडळी, कालवी, वंजारवाडी, लोहशिंगवे, पाथर्डी, दाढेगाव, पिंपळगाव, वडनेर आदी गावांमद‌ध्ये अहिरराव यांनी सोमवारी (दि.११) प्रचार रॅली काढली. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. मतदार संघाच्या विकासाच्या नव्या पर्वास तहसिलदारताईंनी प्रारंभ केला आहे. देवळालीचे त्यांनी व्हिजन डॉक्युमेंट तयार केले असून विकासाच्या संकल्पना घेऊन त्या मतदारांमध्ये जात आहेत. याप्रसंगी शिवसेना युवा सेना जिल्हाप्रमुख सदानंद नवले, उपजिल्हा प्रमुख सुनील गायधनी, तालुकाप्रमुख लकी ढोकणे, पक्षाचे नेते संजय तुंगार, केशव शिंदे, विक्रम सोनवणे, मंगेश सोनवणे, भास्कर थोरात, निवृत्ती मुठाळ यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

देवळाली मतदारसंघाशी २० वर्षांपासून नाळ जुळली आहे. निवडणूका म्हणून नव्हे तर तहसीलदार असतांनापासून मी काम करते आहे. माझे काम पाहून येथील जनतेने मला निवडणूक लढण्याची विनंती केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. हा विश्वास मी निश्चितपणे सार्थ ठरवेल.
-डॉ. राजश्री अहिरराव, उमेदवार, शिवसेना (शिंदे गट)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT