आज 'नर्सिंग ऑफीसर इन इएसआयसी' file photo
नाशिक

Nashik News |'युपीएससी' तर्फे आज नर्सिंग अधिकारी परीक्षा

बेस्ट ऑफ लक! आज 'नर्सिंग ऑफीसर इन इएसआयसी'ची परीक्षा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक: केंद्रिय आयोगातर्फे घेतल्या जाणारी 'नर्सिंग ऑफीसर इन इएसआयसी' परीक्षा रविवारी (दि. ७) रोजी दुपारी दोन ते चार या वेळेत घेतली जात आहे.

शहरात विविध केंद्रांमध्ये परीक्षा घेतली जाणार असून भोंसला कॉलेजमधील केंद्र येथून ३८४ विदयार्थी परीक्षा देणार आहे. १८ ते ३० वयोगटातील नर्सिंग शिक्षणक्रमातील पदवी किंवा जीएनएम(डिप्लोमा इन जनरल नर्सिंग ॲण्ड मिडवायफरी) उत्तीर्ण उमेदवार या परीक्षेसाठी पात्र आहेत. दरम्यान, आयोगाने यापूर्वीच म्हणजे २८ जून रोजी प्रवेशपत्र जारी केले आहेत. ईएसआयसी स्टाफ नर्स भरती महत्वाकांक्षी मानली जात असून या प्रक्रियेतून आरोग्यसेवा व्यावसायिकांना केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे कर्मचारी राज्य विमा निगममध्ये सहभागी होऊन सेवा देण्याची संधी दिली जाते.

१२५ गुणांची परीक्षा

परीक्षा दोन विभागात१२५ गुणांसाठी घेतली जाणार आहे.१०० गुणांचे तांत्रिक आणि वस्तुनिष्ठ प्रश्न आणि २५ गुणांचे योग्यता चाचणी (ॲप्टीट्यूड) आणि सामान्य ज्ञानावर प्रश्न असणार आहेत. परीक्षेत उत्तीर्ण आणि पात्र उमेदवारांच्या मूलाखती घेतल्या जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT