राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षा (साईटीसेल)
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षा (साईटीसेल)  file photo
नाशिक

Nashik News | अभियांत्रिकी 'कॅप' फेरीला आज प्रारंभ

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षा (साईटीसेल) मार्फत रविवारी (दि. १४) अभियांत्रिकी अभ्यासक्रमास केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ होत आहे.

शनिवारी (दि. १३) डी.एड. आणि एम. एचएमसीटी अभ्यासक्रमांच्या प्रवेश फेरीला प्रारंभ झाला आहे. बीई आणि बीटेक अभ्यासक्रमांच्या प्रवेश फेरींनाही रविवारी (दि. 1४) प्रारंभ होणार आहे.

सीईटी सेलतर्फे 4 जुलैला पदवी, पदव्युत्तर २० शिक्षणक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी तात्पुरते वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यात उच्च तसेच तंत्रशिक्षण अशा दोन्ही शिक्षणक्रमांच्या 'कॅप'चा समावेश होता. त्यानुसार १० जुलैला 'कॅप' फेऱ्यांना प्रारंभ होणार असल्याने विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार होती. परंतु सीईटी सेलतर्फे पूर्वनियोजित तारखांमध्ये बदल करण्यात आला असून आता रविवारी (दि. १४) अभियांत्रिकी 'कॅप' सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना नाव नाेंदणी आणि महाविद्यालयांचा पसंतीक्रम यांचा तपशील भरावा लागणार आहे. त्यानंतर गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. विविध प्रवेश फेऱ्यांच्या माध्यमातून ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. सीईटी सेलमार्फत अभियांत्रिकीसह एकूण १२ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतचे अधिकृत तपशील जाहीर करण्यात आले आहेत.

SCROLL FOR NEXT