नाशिक : कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागांतर्गत जिल्ह्यातील उमदेवारांना इस्त्राईल येथे रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. इस्त्राईल येथील नॉन वॉर झोनमध्ये घरगुती सहायक क्षेत्रात युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी https://maharashtrainternational.com/jobdetail.aspx या संकेतस्थळावर माहिती भरावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्राच्या सहायक आयुक्त अनिसा तडवी यांनी प्रसिद्धिपत्रकान्वये केले आहे.
भारतीय प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवायफरीमधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिकार्यांच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंट याबाबतचे प्रशिक्षण पूर्ण असलेले, जीडीए, एएनएम, जीएनएम, बीएस्सी नर्सिंग, पोस्ट बीएस्सी नर्सिंगची शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवारही या रोजगारासाठी पात्र आहेत.
पात्र उमेदवारांना 1 लाख 31 हजारांपर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे.
याबाबत अधिक माहितीसाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक या कार्यालयात प्रत्यक्ष अथवा कार्यालयाचा 0253-2993321 दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
इस्त्राईलमध्ये रोजगार व नोकरीसाठी इंग्रजी भाषेचे तसेच सामान्य ज्ञान असणारे 25 ते 45 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र आहेत. उमदेवाराने काळजीवाहू (घरगुती सहायक) सेवांसाठी निपुण, पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त असलेला व किमान 990 तासांचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. त्याचे प्रमाणपत्र (ऑन जॉब ट्रेनिंगसह) असणे आवश्यक आहे.