Bhandara Crime Pudhari file Photo
नाशिक

Fake Marriage Fraud | कुंपणामुळे महिलेचा मृत्यू ; तपासात फसवणूक उघड

Fake Marriage Fraud | लग्नासाठी दीड लाखाचा व्यवहार केल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील लुल्ले शिवारात जंगली प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी उभारलेल्या लोखंडी तारांच्या कुंपणात विद्युत प्रवाह सोडल्याने महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. सुरुवातीला आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झालेल्या या प्रकरणाच्या तपासाला वेगळे वळण मिळाले आहे.

मृत निलुबेन सीतारामभाई भोया (३२, रा. मुलगम, गुजरात) यांच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून लग्नाच्या व्यवहारात फसवणूक केल्याचा तसेच विद्युत प्रवाह सोडलेल्या कुंपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत चौघांविरुद्ध वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी बतीबेन सीतारामभाई भोया (६७) यांच्या फिर्यादीवरून शैलेशभाई लक्ष्मणभाई गावित (२६), प्रकाश (पूर्ण नाव माहीत नाही), संजय सखाराम गांगुर्डे आणि भाऊसाहेब सोन्या गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी बतीबेन यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची मुलगी निलुबेन हिचे यापूर्वी लग्न झालेले असतानाही ही बाब चैत्राम देविदास अहिरे यांच्यापासून लपवण्यात आली. निलुबेनचे नाव 'निलुबेन संतोषभाई भोये' असे असल्याचे चैत्राम अहिरे यांना सांगण्यात आले. तसेच आरोपी शैलेश गावितने स्वतःला निलुबेनचा भाऊ असल्याचे सांगितल्याचा आरोप आहे.

शैलेश गावित व प्रकाश यांनी चैत्राम अहिरे यांच्याकडून लग्नासाठी दीड लाख रुपये घेतले आणि ५ सप्टेंबर रोजी निलुबेन यांना त्यांच्या ताब्यात दिले, अशी फिर्यादीत नोंद आहे. त्यामुळे लग्नाच्या व्यवहारात चैत्राम अहिरे यांची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. लग्नानंतर निलुबेन कोणालाही काही न सांगता आईकडे जात असताना, लुल्ले शिवारातील शेतगट क्रमांक ६१ मधील लोखंडी तारांच्या कुंपणाच्या संपर्कात आल्या.

हे कुंपण आरोपी भाऊसाहेब सोन्या गायकवाड यांच्या शेतात असून, जंगली प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी लोखंडी तारांमध्ये विद्युत प्रवाह सोडण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या कुंपणाच्या तारेत विद्युत प्रवाह सोडल्याने व्यक्तीच्या संपर्कात आल्यास मृत्यू होऊ शकतो, याची जाणीव असतानाही कुंपणाला विद्युत प्रवाह जोडण्यात आल्याचा आरोप आहे. त्याच तारेला निलुबेन यांचा स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

आकस्मिक मृत्यूच्या चौकशीनंतर गुन्हा

सुरुवातीला या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या चौकशीच्या अनुषंगाने तसेच मयत महिलेच्या आईने ११ सप्टेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री ८.३६ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश जाधव करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT