विधानसभेचे रणशिंग ! Maharashtra Legislative Assembly file photo
नाशिक

Elections in Maharashtra | जिल्ह्यात ५० लाख मतदार निवडणार आमदार

विधानसभेचा बिगुल : आदर्श आचारसंहिता लागू

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी (दि. १५) विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला आहे. नाशिक जिल्ह्यातील १५ मतदारसंघांत २० नोव्हेंबरला मतदान व २३ तारखेला मतमोजणी पार पडणार आहे. लोकसभेच्या तुलनेत जिल्ह्यात ४ लाख ८३ हजार ४१७ नवमतदार वाढले आहेत. यंदाच्या निवडणुकीत ५० लाख २८ हजार ७२ मतदार हे मतदानाचा हक्क बजावतील, अशी माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Voting in 15 constituencies of Nashik district will be held on 20th November and counting of votes will be held on 23rd)

  • पुरुष मतदार 25 लाख 99 हजार 839

  • महिला मतदार 24 लाख 28 हजार 113

  • 120 तृतीयपंथी मतदार, 8,811 सैनिक मतदार

  • चार हजार ९२६ एकूण मतदान केंद्र

  • उमेदवारांना ४० लाखांची खर्च मर्यादा

  • मतदारसंघनिहाय प्रत्येकी ९ फिरती व स्थिर सर्वेक्षण पथके,

  • मतदारसंघात प्रत्येकी ३ व्हिडिओ सर्वेक्षण व व्हिडिओ देखरेख पथके

  • जिल्ह्यासाठी १०,८८२ बॅलेट तर ६,२४७ कंट्रोल युनिट

  • ६ हजार ७३९ व्हीव्हीपॅट प्राप्त

  • निवडणूक मुख्य निरीक्षकांची नियुक्ती

  • जिल्हाभरात विविध भरारी पथके, स्थिर पथके तैनात

  • सुरक्षेसाठी पोेलिसांसह शीघ्र कृती दल, राखीव पोलिस दल नियुक्त

विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम घोषित झाला आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेप्रसंगी शर्मा बोलत होते. जिल्ह्यात ४,९१९ मतदान केंद्र असून ७ सहायकारी मतदान केंद्र असे एकूण ४ हजार ९२६ मतदान केंद्र अंतिम करण्यात आली. जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

जिल्ह्यातील १५ ही मतदारसंघांत निवडणूक कामासाठी २७ हजार अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले जाणार आहे, असेही शर्मा यांनी सांगितले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे आदी उपस्थित होते.

तक्रारींसाठी सी-व्हिजिल

जिल्ह्यात कोठेही आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्यास नागरिकांना C- VIGIL ॲपद्वारे तक्रार नोंदविता येईल. या अॅपवर निवडणूकसंदर्भात आक्षेपार्ह छायाचित्र, व्हिडिओ पाठवून तक्रार नोंदविता येईल. अशा तक्रारींवर भरारी पथक १०० मिनिटांच्या आत कार्यवाही करून तक्रार निकाली काढली जाईल, असे जलज शर्मा यांनी सांगितले.

ज्येष्ठांसाठी गृह मतदान

२०१९ च्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिली. मतदान केंद्रांवर मूलभूत सोयी सुविधा, पिण्याचे पाणी, शौचालय, वाहनतळ, व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात येतील. स्वीपद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. ८५ वर्षांवरील मतदारांसाठी गृहमतदानाची सुविधा असेल. बीएलओंमार्फत मतदार चिठ्ठी व मार्गदर्शिका मतदारांपर्यंत पोहोचविण्यात येईल. अधिकधिक मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन शर्मा यांनी केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT