देवळा ; खर्डे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी भाग्यश्री जितेंद्र पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते उपसरपंच सुनील नारायण जाधव यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी नूतन उपसरपंच निवडीसाठी शुक्रवारी दि. ३ रोजी दुपारी १ वाजता ग्रामपंचायत सभागृहात सरपंच जिभाऊ मोहन यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी उपसरपंच पदासाठी भाग्यश्री पवार यांचा निर्धारित वेळेत एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने ग्रामविकास अधिकारी योगेश पगार यांनी पवार यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.
यानंतर नूतन उपसरपंच भाग्यश्री पवार यांचा सरपंच जिभाऊ मोहन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पवार समर्थकांनी फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष केला. निवडीनंतर उपसरपंच भाग्यश्री पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी सदस्य सुनील जाधव, खुशाली देवरे, संगीत पवार, आशा पवार, वाळी पवार, साखरबाई माळी आदींसह विकास सोसायटीचे माजी सभापती रामदास गांगुर्डे, संचालक संदिप पवार, संचालक कारभारी जाधव, शिवसेनेचे विजय जगताप, शशिकांत ठाकरे, बापू जाधव, प्रहारचे भाऊसाहेब मोरे, दत्तू मोरे, भाऊसाहेब देवरे, हर्षद मोरे, शशिकांत पवार, माजी सदस्य गोकुळ जगताप , गोरख अहिरे, जितेंद्र पवार, जयेश पाटील, माजी उपसरपंच काकाजी देवरे, नामदेव पवार, वंसत पवार, ज्ञानेश्वर पवार, भाऊराव पवार आदींसह कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते .