नाशिक : नाशिकमधील नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीतर्फे निवडणूक लढविणारे भाजपचे राहुल ढिकले यांनी सर्वाधिक 33 लाख नाशिक पश्चिममध्ये शिवसेनेचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी 30 लाख तर नाशिक मध्य मध्ये देवयानी फरांदे यांनी 26 लाख रुपये खर्च करुन आघाडी घेतली. याचवेळी मोदींच्या सभेसाठी 40 लाख खर्च तर ठाकरेंच्या सभेला 15 लाख रुपये खर्च करण्यात आला. खर्चाचा तपशील बघता तो पक्षीय उमेदवारांच्या खात्यावर समसमान प्रमाणात वाटप करण्यात आला.
नाशिकमधील चारही मतदारसंघात खर्चात भाजपचे राहूल ढिकले आघाडीवर असून त्यांनी 33 लाख रुपये खर्च केला आहे. विधानसभा निवडणूका पार पडल्यानंतर 45 दिवसांत सर्वच उमेदवारांना आपला खर्च निवडणूक निरीक्षकांकडे सादर करावा लागतो. त्यासाठी दोन दिवसांपासून 3 खर्च निरीक्षक नाशिकमध्ये असून गुरुवारी (दि.19) जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघनिहाय त्याची तपासणी करण्यात आली.
नाशिक पूर्वच्या लढतीतील प्रमुख उमेदवार अॅड. राहुल ढिकले (30 लाख 55 हजार 760) त्या खालोखाल गणेश गीते (28 लाख 5हजार 161) व करण गायकर (11 लाख 18 हजार 730) प्रसाद सानप (9 लाख 90 हजार 131) या खर्चाला निवडणूक खर्च निरीक्षकांनी मंजुरी दिली. नाशिक मध्यच्या निवडणुकीतील प्रमुख तीन उमेदवारांमध्ये देवयानी फरांदे (26 लाख 12 हजार 98) या अग्रस्थानी होत्या. त्या खालोखाल वसंत गीते (21 लाख 53 हजार 873) व मुशीर सय्यद (4,42, 445) यांनी खर्चाचे अहवाल सादर केले. यात देवयानी फरांदे यांच्या खर्चात 68 495 रुपयांचा फरक निरीक्षकांनी काढला होता. अंतिमत: तो उमेदवारांनी मान्य केल्यामुळे खर्चाला अंतिम मान्यता देण्यात आली. नाशिक पश्चिम मतदारसंघात उबाठा शिवसेनेचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी 30 लाख 58 हजार 747 तर सीमा हिरे 29 लाख 34 हजार 440, तर दिनकर पाटील यांनी 25 लाख 15 हजार 356 यांनी खर्च केला.