ई ऑफिस प्रणाली 
नाशिक

Education News : ई ऑफिस प्रणालीतून शिक्षण विभाग टाकतयं कात !

पुढारी विशेष ! शाळा ते जिल्हा परीषद शिक्षणविभागाचे पत्रव्यवहार ऑनलाइन, पेपरलेस कामकाजामुळे गतिमानता

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : विकास गामणे

ई ऑफिस प्रणालीतून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाने डिजिटलकडे वाटचाल सुरू केली आहे. दोन्ही विभागांनी ई ऑफिस प्रणाली लागू केली आहे. यात सर्व प्रस्ताव आणि पत्र व्यवहार फक्त ई ऑफिस प्रणाली मार्फतच स्वीकारले जात आहे. या माध्यमातून कामकाजाला गती मिळणार असून ऑनलाइन कामकाजामुळे पत्रव्यवहार व विविध मान्यता देखील गतिमान होणार आहे. राज्य शासनाने मुख्यमंत्री १५० दिवसांचा कृती कार्यक्रम हाती घेतला असून याअंतर्गत सर्व कार्यालयात यापुढे ई-ऑफिस प्रणालीचा वापर अनिवार्य केला आहे.

स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त २०४७ पर्यंत विकसित भारत करण्याचा केंद्र सरकारचा संकल्प आहे. त्यानुसरून एकत्रित १५० दिवसांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून प्रशासकीय कामकाजात सुत्रता व गतिमानता आणण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने स्वतंत्र पत्र काढले असून सर्व राज्यस्तरीय, विभागीय, जिल्हास्तरीय शिक्षण अधिकारी कार्यालय आपल्या कामकाजात ई ऑफिस प्रणालीचा वापर करतील, असे त्यात स्पष्ट केले आहे. सर्व शासकीय कार्यालयांचा कारभार गतिमान करण्यासाठी ई ऑफिस कार्यप्रणालीचा अवलंब करा, असे आदेश शासनाने दिले असून जिल्हा परिषदेत ई ऑफिस कार्यप्रणालीचा अवलंब करण्यात येत आहे.

ई ऑफिस कार्यप्रणाली प्रभावीपणे राबविल्याने प्रशासनात गतिमानता येणार आहे. प्रशासकीय कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान पारदर्शक व कामकाजात सुसूत्रता, दस्तऐवज व माहिती सुरक्षित, त्वरेने प्राप्त होऊन, निर्णय प्रक्रिया सुलभ होऊन प्रकरणे निकाली काढण्यास गतिमानता येणार आहे. त्यामुळे ई-मेलचा वापर करून ई ऑफीस कार्य प्रणालीचा वापर सक्तीने करण्यात येत आहे. पत्रव्यवहार, सर्व प्रकरणे, विकास कामे, देयके, वैद्यकीय बिले, सेवा पुस्तके, नसती या सर्व बाबी ई ऑफिस कार्यप्रणालीत नोंद झाल्यानंतरच स्वीकारण्यात याव्यात असे धोरण निश्चित करण्यात आले आहे.

Nashik Latest News

शिक्षण विभागाची आघाडी

जिल्हा परिषदेतील काही विभाग या ई ऑफिस प्रणालीचा वापर करत आहे. आता प्राथमिक व माध्यमिक विभागानेही सर्व मुख्याध्यापक, प्राचार्यांना पत्र देऊन ई ऑफिस प्रणालीचा वापर अनिवार्य केला आहे. कुठलाही प्रस्ताव सादर करताना मुख्याध्यापकांनी शाळेच्या अधिकृत ई-मेलवरून पीडीएफ स्वरूपात शिक्षण विभागाला ई ऑफिस प्रणालीच्या ईमेलवरच सर्व प्रस्ताव पाठवायचे आहे. विशेष म्हणजे, आता कुठलेही प्रस्ताव हार्ड कॉपीत स्वीकारले जाणार नसल्याचे स्पष्ट केले असून पत्र मंजुरी मिळाल्यानंतर त्याचे उत्तर व विविध आदेश देखील शाळांना ईमेलवरच पाठविले जाणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार आता गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत प्रस्ताव येण्यास सुरुरूवात झाली आहे. बहुतांश प्रस्ताव हे ऑनलाइन येत आहे.

ही कामे ई ऑफिस प्रणाली मार्फतच...

  • विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, जन्म दिनांक, जात बदल दुरुस्ती प्रस्ताव

  • मुख्याध्यापकांचे तात्पुरते सह्यांचे अधिकार प्रस्ताव

  • मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व सर्व पदांचे पदोन्नती प्रस्ताव

  • इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेचे सर्व प्रस्ताव

  • रजा रोखीकरण प्रस्ताव

  • जिल्हा बदली, प्रशासकीय बदल्या प्रस्ताव

  • वेतनेतर अनुदान प्रस्ताव

  • सेमी इंग्रजी व विषय मान्यता प्रस्ताव

  • रजाकालीन शिक्षक मान्यता प्रस्ताव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT