नाशिक : प्रफुल्ल पवार
राज्यात ई-हक्क प्रणालीचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून राज्यात तब्बल १० लाखाहून अधिक नागरिकांनी आपले अर्ज दाखल केले आहे. नाशिक विभागातून ४ लाख ७३ हजार अर्ज दाखल झाले आहे.
ई-हक्क प्रणालीतून जमीन खरेदी-विक्री नोंदी, नावे लावणे-काढणे, मृत्यूची नोंद अशा कामांसाठी यापूर्वी नागरिकांना वारंवार तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते. या समस्यांवर तोडगा म्हणून राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वी ई-हक्क प्रणाली सुरू केली. या प्रणालीचा सर्वाधिक लाभ ४ लाख ७३ हजार १७५ इतके अर्ज नाशिक विभागातील नागरिकांनी घेतला आहे. पाठोपाठ पुणे विभागातून ३ लाख २१ हजार २१३ इतके अर्ज दाखल झाले आहे. इ-हक्क प्रणालीत नाशिक विभागाने चांगलीच भरारी घेतली आहे.
या होत्या समस्या
तलाठी, नागरिकांत वाद वाढले वाढत असल्याने आर्थिक व्यवहार होत होते. नागरिक व शेतकऱ्यांची कामे प्रलंबित राहत असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाया वाढल्या होत्या. तलाठ्यांना इतर शासकीय कामांसाठी वेळ मिळत नव्हता. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून ई-हक्क प्रणाली राबवण्यात आली.
यामुळे अर्जांत वाढ
तलाठी कार्यालयात जाण्याची गरज कमी
शेतकरी व नागरिकांच्या पैसा व वेळेत बचत
कर्ज प्रकरणांची प्रक्रिया सुलभ
आर्थिक व्यवहारांना बसला आळा
तलाठ्यांना इतर शासकीय कामांसाठी मिळणार वेळ
नागरिकांना घरबसल्या सुविधा उपलब्ध
या प्रणालीतून होतात ही कामे
ई - करार
बोजा चढवणे-गहाणखत
बोजा कमी करणे
वारस नोंद
मृत्यू नोंद (नावे कमी करणे)
अ.पा.क शेरा कमी करणे
ए कु में नोंद कमी करणे
विश्वस्तांचे नावे बदलणे
खातेदाराची माहिती भरणे
हस्तलिखित व संगणीकृत सातबारा दुरुस्ती
मयत कुळाची वारस नोंद
ई-हक्क प्रणालीमुळे समस्या
ई-हक्क प्रणालीत वारंवार तांत्रिक बिघाड
सर्व्हर डाऊन राहिल्याने अर्ज प्रक्रिया रखडणे
फेरफार नोंदी वेळेत मंजूर न होणे
जमीन खरेदी - विक्री व्यवहारांना विलंब
अर्ज करताना माहिती अपलोड होण्यात अडथळे
प्रणाली वापरण्याबाबत मार्गदर्शनाचा अभाव
प्रणालीत सुधारणा करण्याची मागणी
शासनाने ई-हक्क प्रणालीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. नागरिकांच्या समस्या सोडवल्या जात आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त या प्रणालीचा लाभ घ्यावा.विठ्ठल सोनवणे, सहाय्यक आयुक्त,
राज्यात यशस्वी अंमलबजावणी
दाखल अर्ज - १०,२७,५४३
स्वीकृत अर्ज - ८,१७,५३८
त्रुटी पूर्ततेसाठी परत अर्ज - १,९८,३३२
ग्राम अधिकाऱ्यांकडे प्रलंबित अर्ज - १०,६७३
राज्यातील विभागीय आकडेवारी अशी...
अमरावती - १,२२,३४७
कोकण (मुंबई) - २४३३८
छत्रपती संभाजीनगर - ३७,२६०
नागपूर - ४८,२१०
नाशिक - ४,७३,१७५
पुणे - ३,२१,२१३