विजयादशमीचे औचित्य साधत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शहरात २२ ठिकाणी संचलन करण्यात येत आहे pudhari news network
नाशिक

Dussehra 2024: संघ संचलनाने गजबजणार नाशिकचे चौक अन् रस्ते

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : विजयादशमीचे औचित्य साधत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शनिवारी (दि. १२) शहरात २२ ठिकाणी संचलन करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक गणवेशात सदंड, सघोष संचलनात स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. प्रत्येक संचलनात दीडशे स्वयंसेवकांची उपस्थिती आहे. संचलनामध्ये घोष (बॅन्ड), चारचाकी वाहन, भगवा ध्वज व सदंड रक्षक हे वैशिष्ट आहे, असे संघाचे शहर जिल्हा कार्यवाह सुहास वैद्य यांनी सांगितले.

विजयादशमी आणि संघ संचलन हे जणू समीकरणच बनले आहे. या संचलनाची नाशिककरांना दरवर्षी उत्सूकता असते. किंबहुना वेगवेगळ्या भागातून निघाणाऱ्या या संचलनाचे मार्गावर आकर्षक रांगोळी काढून तसेच स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी करण्यातही नाशिककर पुढे असतात. काही उत्साही नागरिक या संचलनात सहभागी होत असतात.

संचलनाचे नियोजन असे...

  • पंचवटी गट - वेळ: सकाळी ८ ते ९, प्रारंभ : सिद्धिविनायक चौक,

  • भद्रकाली गट - वेळ : सकाळी १० ते ११, प्रारंभ : प्रज्ञा नगर,

  • रविवार कारंजा - वेळ : सकाळी ७ ते ८:३०, प्रारंभ : गोदाघाट (खंडेराव महाराज मंदिर), इंदिरानगर गट - सकाळी ७.१५, प्रारंभ : जाखडी नगर कॉर्नर,

  • आगर टाकळी- वेळ : सकाळी ७:३० ते ९, प्रारंभ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, जीएसटीभवन रोड- वेळ दुपारी ४.३० वाजता, प्रारंभ : महा गणपती मंदिर (जीएसटी भवन रोड),

  • आडगाव-म्हसरूळ गट- वेळ- सकाळी ८ वाजता, प्रारंभ: जिजामाता सार्वजनिक उद्यान जुईनगर,

  • मखमलाबाद- वेळ: सकाळी ८.४०, प्रारंभ: संत जनार्दन स्वामी उद्यान,

  • शिंदे नगर, तपोवन- सकाळी ८, प्रारंभ: जिजामाता उद्यान क्रीडा नगरी,

  • सिडको गट- वेळ: सकाळी ८, प्रारंभ: ग्रामोदय तरुण व्यवसाय शाखेपासून,

  • अंबड- वेळ सकाळी ९, प्रारंभ: सिद्धिविनायक गणेश मंदिर,उपेन्द्र नगर.

  • पवनगर- वेळ: सकाळी ८, प्रारंभ: पवननगर चौक.

  • खुटवड नगर: वेळ: सायंकाळी ५.१५.

  • नाशिकरोड जेलरोड- वेळ: सकाळी ७.३०, प्रारंभ- शिवरामनगर.

  • मुक्तिधाम- वेळ: सकाळी ८, प्रारंभ- के जे मेहता हायस्कूल येथून.

  • भोसला गट - सकाळी ८, प्रारंभ : सिरीन मेडोज‌.

  • सातपूर- वेळ: सकाळी ७.३०, प्रारंभ : छत्रपती शिवाजी शाळा मैदान.

  • समर्थ नगर, महात्मा नगर- वेळ : सकाळी ८, प्रारंभ : महात्मानगर.

  • गिरणारे- प्रारंभ : प्रोग्रेसिव इंग्लिश मिडियम स्कूल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT