डेटिंग ॲपमुळे तरुणाईचे भावविश्व उद्ध्वस्त होत आहे. प्रेमसंबंध, नात्यांचे अधिष्ठान, त्याग, सहचार्य या कल्पना डेटींग ॲपवरील साथीदाराच्या सहज उपलब्धतेमुळे तकलादू होत असून अशा पद्धतीने साथीदाराचा शोध घेणारे युवा ड्रिप्रेशनची शिकार होत असल्याचे मत समाज अभ्यासी नोंदवतात.
'डेटिंग ॲप' मधून जोडीदाराचा शोध घेणे, लाईक, स्वाईप, कंमेंटव्दारे 'फ्रेंडस् व्युईथ बेनीफीटस'चा शोध घेणे, एक झाले नवीन साथीदारांचा शोध या चक्रामध्ये १६ ते ३५ वयोगटातील तरुणाई अडकली आहे. समाज अभ्यासिंनी याला 'डेटींग ॲप बर्नआऊट' अशी संज्ञा दिली आहे. मुळात दोन व्यक्ती सारख्याच विचारांनीच एकत्र येतील हे सांगता येत नाही. त्यांनी कितीही चॅटिंग करून विचार जुळले असे भासावले तरी प्रत्यक्षात तसे होत नाही. हे विश्व सत्याभासी आहे. रंग, रूप, विचार, प्रोफाइलपासून ते अगदी भावना, सापंत्तिक स्थिती पर्यंत जे दाखवले जाते. दिसते, वाटते तसे असत नाही. मग एकाधी व्यक्ती जर दुसऱ्यात भावनिक दृष्ट्या गुंतल्या तर प्रकरण गंभीर होत जाते. डेटींग साईट ने एका क्लीकवर सर्वकाही विनासायस उपलब्ध होत असल्याने 'वन नाईट स्टँड' 'फ्रेंडस व्युईथ बेनिफिट' मनोवृत्ती युवावर्ग वाढत आहे. यामुळे तरुणाई मानसिक थकवा, नैराश्य, चिडचिडेपणा, एकटेपणा, बैचेनी (ॲनझाईटी) आदी मनोआजाराची शिकार होत असल्याची निरीक्षण समाज अभ्यासींनी नोंदवले.
पूर्वी मित्र- मैत्रिणी परिचयातील, शाळेतील, पाहण्यातील असायचे. व्यक्तींची पारिवारिक पार्श्वभूमी काय हे माहिती असे. त्यामुळे नात्याचे अधिष्ठान भक्कम असे. डेटींग ॲपवर बोलले तरी विचार, भावना जूळत नसतात. हे व्हच्यूअल माध्यम असल्याने यात दिखावा, धोके अधिक असून लैंगिक अत्याचार, फसवणूकीचे धोके वाढले. त्यामुळे तरुणाई 'नैराश्य'त जात आहे. 'इन्स्टंट' नात्यापासून दूर राहून, जन्मभर टिकेल अशी डोळस नातीच कुटुंब व्यवस्था तारु शकते.प्रा. आसावरी देशपांडे, समाज अभ्यासी. नाशिक
भावनिक बंध निर्माण होऊन शाश्वत नाते तयार व्हावे, असा 'डेटींग ॲप' चे उद्देश नाहीच. एकटेपणा घालवण्यासाठी युवा याचा आधार घेतात. त्यातून याचे 'व्यसन' जडते. एकानंतर एक नवीन साथीदाराचा शोध सुरु होतो. 'मटेरियलिस्टीक' जीवनाची अनिवार ओढीमुळे नात्यातील गांभीर्य, प्रेमभाव, आदर संपुष्टात आला असल्याचे हे द्योतक. अशा ॲपच्या व्यसनात अडल्याने युवावर्गात 'ॲनझाईटी' नैराश्य, चिडचिडेपणा आणि असमाधानी वृत्ती असे गंभीर परिणाम जाणवत आहेत.डॉ. अपर्णा चव्हाण, मानसशास्त्रज्ञ, पुणे