Court Pudhari
नाशिक

Dongarale Murder Case | डोंगराळे खून प्रकरणी आरोपींकडून पुरावे सादर

Dongarale Murder Case | या पुराव्यांवर युक्तिवाद करण्यासाठी फिर्यादी पक्षाने वेळ मागून घेतला असून, न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी २७ जानेवारी निश्चित केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा

डॉगराळे येथील चिमुरडीवरील अत्याचार-खून प्रकरणी खटल्याच्या सुनावणीदरम्यान मंगळवारी (दि.२०) आरोपींच्या वकिलांतर्फे न्यायालयासमोर काही पुराव्यांच्या क्लिप सादर करण्यात आल्या. या पुराव्यांवर युक्तिवाद करण्यासाठी फिर्यादी पक्षाने वेळ मागून घेतला असून, न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी २७ जानेवारी निश्चित केली आहे.

१६ नोव्हेंबर २०२५ ला डोंगराळेत चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निघृण खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास पूर्ण केला असून, पोस्को न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी सोमवार (दि. १९) पासून सुरू झाली आहे. मंगळवारी सुनावणीचा दुसरा दिवस होता. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश तसेच विशेष न्यायालयाचे न्यायाधीश के. आर. पाटील यांच्या न्यायालयासमोर सुनावणी झाली.

सोमवारी मृत बालिकेच्या आईची साक्ष नोंदविण्यात आली. यावेळी आरोपींच्या वकिलांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी प्रसारमाध्यमांना कोणतीही माहिती दिलेली नसल्याचे स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर मंगळवारी आरोपी पक्षाच्या वतीने न्यायालयात काही इलेक्ट्रॉनिक पुरावे व क्लिप सादर करण्यात आल्या.

या सुनावणीस विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला. आरोपींतर्फे दाखल अर्ज व सादर पुराव्यांवर सविस्तर युक्तिवाद करण्यासाठी फिर्यादी पक्षाने न्यायालयाकडे वेळ मागितला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी २७ जानेवारी ही तारीख निश्चित केली आहे. या संवेदनशील प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT