निफाड : बिबट्याच्या हल्ल्यात कुत्र्यांचा बळी गेल्याच्या घटना वारंवार समोर येतात. मात्र कुत्र्यानेच बिबट्याला जबड्यात पकडून फरफटत नेल्याची दुर्मीळ घटना समोर आली आहे. ही थरारक घटना दिंडोरी तास परिसरात घडली असून या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
निफाड तालुक्यातील गोदावरी व कादवा काठच्या गावांमध्ये उसाचे मोठ्या प्रमाणावर क्षेत्र असल्याने बिबट्यांना सुरक्षित अधिवास मिळाला आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या पाळीव जनावरांवर त्यांचे हल्ले वारंवार होत आहेत. गुरुवारी रात्री दिंडोरी तास येथील कैलास दिनकर गांगुर्डे यांच्या वस्तीवर बिबट्याने एका कुत्र्यावर झडप घातली. मात्र त्यावेळी दोन कुत्र्यांनी प्रतिकार करत बिबट्यावर हल्ला चढवला. एका कुत्र्याने बिबट्याचा जबडा पकडून त्याला रस्त्यावर फरफटत नेले.