नाशिक : दिवाळीच्या सुट्या असल्याने सासुरवाशिणी माहेराला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. त्यामुळे परिवहन महामंडळाने तब्बल ९५ ते १०० गाड्या अधिकच्या सुरू केल्या असून यात अडीच लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत. तर धुळे, पुणे, छत्रपती संभाजी नगर, कसारा नंदुरबार व बोरिवली या मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने गाड्या भरगच्च भरून जात आहे.
जिल्यात सध्या सणामुळे सर्वच बस स्थानकावर गर्दीचे लोंढे पहायला मिळत असून एकच घरातील ४ ते ५ लोक एसटी ने प्रवास करत असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यात सध्या सर्वाधिक पुणे मार्गावर ११२ फेऱ्या चालू आहे. पाठोपाठ धुळे मार्गावर ७० फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहे. परिवहन मंडळाने गर्दीचा विचार करत सर्वच मार्गावर ज्यादा गाड्या सोडल्यापासून या गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने परिवहन मंडळाला महसूल चांगला मिळत असल्याचे परिवहन महामंडळ अधिकारी यांनी माहिती दिली .
सध्या वेळापत्रकानुसार अनेक गाड्यांचे बुक्किंग फुल झाल्याने इतर नागरिकांना त्यात जागा भेटत नाही सध्या ई शिवाई व शिवनेरी गाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे ४१ प्रकाशी क्षणात असलेल्या गाडीचे तब्बल ३० ते ३२ सीट बुकिंग होत आहे. त्यात ४ ते ५ शीट अंध ,अपंग महिला अशा घटकांसाठी आरक्षित आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात परिवहन महामंडळाची चांगलीच दिवाळी होत आहे. अजून २ ते ३ दिवस अशीच गर्दी राहणार असल्याने गर्दी नुसार गांडीची क्षमता ठेवण्यात येणार आहे.
सध्या गाड्यांची स्थिती अशी
जिल्ह्यात सध्या ८५० मार्ग सुरू असून ४२०० गाड्यांच्या फेऱ्या सुरू आहे. यासाठी ८४० बस रस्त्यावर चालू आहे तर अडीच लाखाहून अधिक प्रवासी महामंडळाच्या बसने प्रवास करत आहे. यात लालपरी, जनशिवनेरी, इ- बस शिवाई आणि शिवशाही इत्यादी गड्याने प्रवाशी प्रवास करत आहेत.
सध्या नागरिकांचा प्रतीचा प्रवास सुरु झाला आहे. त्यामुळे गर्दी वाढली आहे.पण आम्ही अगोदर पासूनच ज्यादा बस सेवेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. १ तारखे परेंत सर्व मार्गावर ज्यादा बस धावत राहतील प्रवाशांची गैरसोय होणार नाही याकडे आम्ही काटेकोर लक्ष देत आहोत.दादाजी महाजन, आगर व्यवस्थापक