नाशिक

धुळे : पश्चिम पट्ट्यातील चावडी पाडा येथे वनभाजी महोत्सव ; 30 महिलांनी घेतला सहभाग

गणेश सोनवणे

पिंपळनेर : (जि. धुळे) पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील चावडीपाडा येथे सामुहिक वन हक्क व्यवस्थापन समिती, चावडीपाडा व आपला परिसर आपला विकास प्रेरणा वृत्ती कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने वनभाजी स्पर्धा आयोजित करण्यात आली. या वन भाजी स्पर्धेत एकूण 30 महिलांनी सहभाग नोंदविला होता. यात 29 वनभाज्यांचा पाककृती बनवून सुमनबाई सोमनाथ चौरे या महिलेने प्रथम क्रमांक पटकावला तर झुनाबाई सापट्या चौरे यांनी 28 वनभाज्या बनवून दुसरा क्रमांक पटकावला. शर्मीला लक्ष्मण गायकवाड यांनी 29 भाज्या बनवून विजेत्या ठरल्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या महिलांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार बापु बहिरम, प्रमुख पाहुणे अभियंता अशोक सोनवणे, डोंगर बागुल, श्री. सुनील चौरे, सरपंच लक्ष्मण महाले, सरपंच रेखाबाई चौरे, अनिल पवार, प्रेमचंद सोनवणे, उपसरपंच सुरेश चौरे, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रेमचंद सोनवणे, डोंगर बागुल, इंजी अशोक सोनवणे, रमण बहिरम यांनी मार्गदर्शन केले.

स्पर्धेत महिलांनी जंगलातील या भाज्यांचा समावेश केला : 

आळींब, फांद्या, ओवा, बाफळी, बांबू कोम्ब, कडव्या हलुंद, केळभाजी, कोहळा, आंबाडी, चित्रक, देवारी, गोगल, गोमठ, जंगली चुच, मेका, मोका, नाळगोद, घोळभाजी, उदळा, पुंज-या, अळीव, ओवा, केनाभाजी, चटक चांदणी, झेला, तुळश्या कंद, चंदळ, शेवरा, राजगिरा, रानतुळस, सोनरु, सोलव्या नींबू, शिरिसफुल, तुराठा, उळशीमोहर, वनदोडका, वनस्पतीच्या मुळया, पाने फुले, खोड, साल, बी, इत्यादी.

स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून उमेश देशमुख, संगिता चौरे, रमेश गावीत, राजु गावीत, राजेश महाले, विशाल गांगुर्डे यांनी काम पाहिले. तर गुलाब गावीत, चैत्राम पवार, बाबुराव अहिरे, लक्ष्मण चौरे, काळुराम आहिरे, प्रविण देसाई, सुक्राम ठाकरे, पिंट्या मावळी, संतोष चौरे, चुनिलाल चौरे, सुमनबाई चौरे, वालीबाई आहिरे, वैशाली ठाकरे, सुर्वाता मावळी, तसेच जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक प्रकाश गावीत, दासु गावीत, विजय राऊत व ग्रामस्थ आदी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT