फोटो ओळ ; देवळा तालुका खरेदी विक्री संघाचे नूतन व्हा चेअरमन रवींद्र जाधव यांचा सत्कार करतांना सभापती योगेश आहेर समवेत संचालक मंडळ आदी  ( छाया -सोमनाथ जगताप )
नाशिक

देवळा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या व्हा. चेअरमन पदी रवींद्र जाधव यांची बिनविरोध निवड

अर्चना आहेर यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी निवड

पुढारी वृत्तसेवा

देवळा : येथील माजी आमदार कै. शांताराम ( तात्या ) आहेर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या व्हा. चेअरमन पदी रवींद्र दादाजी जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली . संघाच्या मावळत्या व्हा. चेअरमन अर्चना आहेर यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी नूतन पदाधिकारी च्या निवडीसाठी देवळा बाजार समितीचे सभापती व संघाचे संचालक योगेश आबा आहेर यांच्या उपस्थित्तीत व चेअरमन संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार (दि २५) रोजी सकाळी ११ वाजता संस्थेच्या कार्यालयात संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली.

यावेळी सर्वानुमते नूतन व्हा.चेअरमन पदी रवींद्र दादाजी जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा देवळा बाजार समितीचे सभापती योगेश आहेर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . यावेळी संचालक सर्वश्री डॉ. राजेंद्र ब्राह्मणकार, चिंतामण आहेर , नानाजी आहेर , कैलास देवरे , अमोल आहेर , काशिनाथ पवार , हंजराज जाधव , साहेबराव सोनजे , सुलभा आहेर , सुवर्णा देवरे , चेतन गुंजाळ , विनोद देवरे , सचिन सूर्यवंशी , सचिव गोरख आहेर उपस्थित होते. नूतन व्हा. चेअरमन रवींद्र जाधव यांचे सहकार क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT