देवळा : देवळा येथील हॉटेल वेलकममध्ये चालू असलेल्या अवैध वेश्याव्यवसायावर पोलिसांनी शुक्रवारी (दि.21) कारवाई केली. यामध्ये दोन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली. तसेच हॉटेल मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवळा पोलीस ठाणे हद्दीतील मालेगाव रोडजवळील हॉटेल वेलकम येथे हॉटेल मॅनेजर दिपक सुकदेव ठाकरे (रा. देवळा) हा हॉटेलवर गरजू महिलांना पैशाचे आमीष दाखवुन स्व:ताच्या अर्थिक फायद्यासाठी वळजबरीने वेश्याव्यवसाय करुन घेत आहे. अशी माहीती अप्पर पोलीस अधिक्षकांना मिळाली होती.
पोलिसांनी सापळा रचून हॉटेल वेलकमवर रात्री 10:30 वाजता छापा टाकून हॉटेलचे मॅनेजर दिपक सुकदेव ठाकरे यांना ताब्यात घेतले. तसेच वेश्याव्यवसायासाठी डांबून ठेवलेल्या महिलांची सुटका केली. सदर ठिकाणी वेश्या व्यवसायासाठी लागणारे साहित्य साधने तसेच रोख रुपये व सोन्याचांदीचे दागिने तसेच मोबाईल फोन मिळून आले. सदर डांबून ठेवलेल्या महिलांकडे विचारपुस केली असता, आम्हाला वेश्याव्यवसायासाठी हॉटेल मॅनेजर दिपक सुकदेव ठाकरे यांनी बोलावुन घेवुन सदर ठिकाणी पैसे देण्याच्या बदल्यात डांबून ठेवल्याचे सांगितले . हॉटेल मॅनेजर दिपक सुकदेव याच्याविरुद्ध पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते यांचे फिर्यादीवरुन देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .