सिडकोतील गोळीबार प्रकरणी दीपक बडगुजरचे नाव उघड pudhari photo
नाशिक

Deepak Badgujar | दीपक बडगुजरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज निर्णय

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : आरटीआय कार्यकर्ता प्रशांत जाधव यांच्या खुनाची सुपारी दिल्याप्रकरणी आरोप असलेल्या दीपक सुधाकर बडगुजर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर गुरुवारी (दि.१०) युक्तीवाद झाला. या अर्जावर शुक्रवारी (दि.११) निर्णय होण्याची शक्यता आहे.

गुंडाविरोधी पथकाने तपास करीत २०२२ मध्ये झालेल्या उपेंद्रनगर गाेळीबार प्रकरणाचा तपास करुन आकाश आनंदा सूर्यतळ (२४, रा. पंचशीलनगर, शिवाजीनगर), श्रीकांत वाकोडे उर्फ बारक्या (रा. जेतवननगर), सनी पगारे उर्फ टाक्या (रा. जेतवननगर), मयुर बेद यांना पकडले. सखोल चौकशीत दीपक बडगुजरचा निकटवर्तीय अंकुश शेवाळे, प्रसाद शिंदे यांचे नाव उघड झाल्याने त्यांना पोलिसांनी पकडले. दरम्यान, जाधव यांच्या खुनाची सुपारी बडगुजर यांनी दिल्याचे पुरावे समोर आल्याने पोलिसांनी शोधमोहिम सुरु केली. मात्र अटक होणार याची कुणकुण लागताच बडगुजर फरार झाले. त्यांनी अटकपूर्व जामीनाचा प्रयत्न केला. गुरुवारी अंतिम सुनावणी झाली असून दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाला. त्यानुसार, न्यायालयाने अटकपूर्व जामीनावरील निर्णय राखून ठेवला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT