इगतपुरी ( नाशिक ) : काहीही झाले, तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. इगतपुरी नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या उमेदवारांसाठी झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाबळेश्वरनंतर इगतपुरीला थंड हवेचे ठिकाण म्हणून मान्यता देऊन पर्यटनाचा दर्जा देऊन प्रचंड रोजगार उपलब्ध करून देऊ. आडवण येथे महिंद्रा कंपनीचा प्लँट आणत बेरोजगारी दूर करण्याचे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले. यावेळी शिक्षणमंत्री दादा भुसे, मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, माजी खासदार हेमंत गोडसे, माजी आ. काशीनाथ मेंगाळ, शिवराम झोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, प्रदेश उपाध्यक्ष फिरोज पठाण, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, अनिल ढिकले, ॲड. संदीप गुळवे, यांच्यासह शालिनी खातळे, फिरोज पठाण, मयूरी पुरोहित, आशा थोरात, मंगेश शिरोळे, आशा भडांगे, ललिता लोहरे, शोभराज शर्मा, उमेश कस्तुरे, निकहत सय्यद, माला गवळे, अर्जुन खातळे, युवराज भोंडवे, अंजुम कुरेशी, सागर आढार, नाझनीन खान, वैशाली करपे, रोहिदास डावखर, सतीश मनोहर, भारती शिरोळे, राजेंद्र जावरे, रजनी बर्वे या उमेदवारांसह ज्ञानेश्वर लहाने आदी उपस्थित होते.