नाशिक

दै. ‘पुढारी’च्या मातृ दिन सोहळ्यात होणार मान्यवरांचा सन्मान!

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- समाज प्रबोधनाची उपक्रमशीलतेशी सांगड घालणाऱ्या दै. 'पुढारी' वृत्तपत्र परिवाराच्या वतीने मातृ दिनाचे औचित्य साधून शनिवारी (दि. १८) विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध क्षेत्रांत देदीप्यमान कामगिरी नोंदवणाऱ्या मान्यवरांना गौरवण्यात येणार आहे. चतुरस्त्र अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने यांची खास उपस्थिती हे सोहळ्याचे वैशिष्ट्य राहणार आहे.

कॉलेजरोडवरील गोखले एज्युकेशन सोसायटी कॅम्पसमधील पलाश सभागृहात (गुरुदक्षिणा हॉलच्या वर, तिसरा मजला ) हा सोहळा दुपारी ४ पासून रंगणार आहे. याप्रसंगी अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने यांच्यासह गोएसोच्या सचिव डॉ. दीप्ती देशपांडे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर आणि सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक चंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

प्रकट मुलाखत होणार

या सोहळ्याचाच एक भाग म्हणून अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. निर्मिती ॲडव्हर्टायझिंगचे संचालक नंदन दीक्षित आणि किशोरी किणीकर हे कुलकर्णी-मोने यांच्याशी संवाद साधताना त्यांच्या आजवरच्या सिने-नाट्याभिनय वाटचालीचे वैविध्यपूर्ण पदर उलगडणार आहेत.

या सन्मानार्थींना गौरवणार

रंगोली कुटे (हॉटेल व्यावसायिक), डॉ. हर्षा अहिरे (होमिऑपेथी तज्ञ), राजकुमारी चौधरी (श्री श्रीजी गारमेंट्स, संचालक), डॉ. प्रमिला पवार(मानसोपचारतज्ज्ञ), डॉ. स्मिता हिरे(कोषाध्यक्ष, महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती ), कविता मानकर (संस्कृती अॅग्रो टुरिझम), डॉ. अंजली बोऱ्हाडे (दिशा फाउंडेशन, संस्थापक अध्यक्षा), डॉ. काजल पटणी (योगतज्ञ), भीमाबाई जोंधळे (रिलॅक्स कॉर्नर, संचालक), कस्तुराबाई मराठे (गृहीणी), अपूर्वा जाखडी (स्पेस एज्यूकेटर), रिया कानवडे (आंतरराष्ट्रीय जादूगर), नर्मदाबाई बोडके-पाटील (टायगर व्हॅली रिसॉर्ट, संचालक), मधुबेन भालोडिया (गृहिणी), कल्पना निकुंभ (संवाद अकॅडमी, संचालिका), ऍड. अनिता निमसे (वकील).

हेही वाचा –

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT