नाशिककरांच्या विश्वासाचा सोहळा! दै. 'पुढारी' नाशिक आवृत्तीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा 
नाशिक

Pudhari Anniversary Nashik | स्नेहमिलन सोहळ्यात 'पुढारी'वर शुभेच्छांचा वर्षाव

Pudhari Anniversary Nashik | मंगलमय वातावरण अन् सुहृदांच्या अलोट उपस्थितीत दै. 'पुढारी'च्या नाशिक आवृत्तीचा वर्धापन दिन अपूर्व उत्साहात साजरा झाला.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मंगलमय वातावरण अन् सुहृदांच्या अलोट उपस्थितीत दै. 'पुढारी'च्या नाशिक आवृत्तीचा वर्धापन दिन अपूर्व उत्साहात साजरा झाला. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक, साहित्यिक, चित्रपटसृष्टी, प्रतिष्ठित जाहिरातदार व प्रशासनासह सर्वसामान्य नाशिककरांनी या स्नेहमेळाव्याला उपस्थिती दर्शवित 'पुढारी'वर शुभेच्छांचा वर्षाव केला.

गंगापूर रोड, विद्या विकास सर्कल येथील कुसुमाग्रज स्मारक येथे स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने विविध क्षेत्रांतील स्नेहीजनांच्या भेटीचा योग जुळवून आल्याने जिल्हाभरातून आलेल्या विविध मान्यवरांनी या सोहळ्यात एकमेकांशी मनमोकळा संवाद साधला.

यावेळी महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, नाशिक क्षेत्र विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा,

पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, मविप्रचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील, एमईटीच्या संचालिका शेफाली भुजबळ,

शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते, भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार, उपजिल्हाधिकारी कुंदन हिरे, जिल्हा विकास ग्रामीण यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके, पोलिस उपआयुक्त किरीथिका सी. एम, मोनिका राऊत, किशोर काळे, अद्विता शिंदे, सचिन बारी, शेखर देशमुख, महापालिका उपआयुक्त लक्ष्मीकांत साताळकर, अजित निकत, अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत, रवींद्र धारणकर,

बाजीराव माळी, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, निमा अध्यक्ष आशिष नहार, आयमा अध्यक्ष राजेंद्र पानसरे, नाईस अध्यक्ष रमेश वैश्य, लघुउद्योग भारतीचे अध्यक्ष निखिल तापडिया, महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष संजय सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीसह अनेक मान्यवरांनी सोहळ्याला उपस्थित राहून 'पुढारी'वर शुभेच्छांचा वर्षाव केला.

याप्रसंगी दै 'पुढारी' च्या नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक डॉ. राहुल रनाळकर, युनिट हेड बाळासाहेब वाजे, मुख्य वार्ताहर आसिफ सय्यद, वितरणचे शरद धनवटे, वित्त विभागाचे नरेंद्र वैद्य यांनी शुभेच्छांचा स्वीकार केला.

अत्यंत उत्साही व जल्लोषी वातावरणात झालेल्या या गौरव सोहळ्याचा जोश व उल्हास अखेरपर्यंत वाहत गेला. अनेक मान्यवरांनी उशिरापर्यंत थांबून कार्यक्रमाचा आनंद घेतला. 'पुढारी' वर्धापनदिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने हे सारे समाजघटक काही काळ एकत्र रमले,

दिलखुलास गप्पा झाल्या. मधूनच राजकीय टोलेबाजी झाली. यावेळी 'पुढारी' विषयी आदरभाव, निर्भीड पत्रकारितेविषयीचा विश्वास व नाशिक जिल्ह्यातील जनतेच्या कल्याणासाठी 'पुढारी' सातत्याने घेत असलेली भूमिका याबाबत मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.

भ्रमणध्वनीद्वारे आलेल्या मान्यवरांच्या शुभेच्छा

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्ता कराळे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक भारत तांगडे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा,

फ्रवशी अकॅडमीचे रतन लथ, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल तोरणे आदींनी शुभेच्छा दिल्या, तर पोलिस आयुक्त डॉ. संदीप कर्णिक यांनी कार्यालयात येऊन शुभेच्छा दिल्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT