नाशिक : राज्यात आज पार पडलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत (टीइटी) नाशिक येथील सीडीओ मेरी हायस्कूल येथे इंग्रजी माध्यमाच्या परीक्षार्थींना मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला. प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका बदलून देण्यात आल्या नाहीत. राज्यात अनेक ठिकाणी असे प्रसंग घडल्याने परिक्षार्थींनी संपात व्यक्त केला आहे.
सकाळी साडेदहाला परीक्षा सुरू होताच चुकीच्या माध्यमाच्या प्रश्नपत्रिका मिळाल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. विद्यार्थ्यांनी तत्काळ केंद्र प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना हा प्रकार निदर्शनास आणून दिला. परंतु प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. चुकीच्या प्रश्नपत्रिकांची बदलून देण्याऐवजी वाटप करण्यात आलेल्याच प्रश्नपत्रिका सोडविण्याची सक्ती करण्यात आल्याचा आरोप अनेक परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी केला. राज्यातील परीक्षा प्रणाली किती ढिसाळ आहे, हे आजच्या गोंधळातून पुन्हा एकदा सिध्द झाले.
शिक्षक पात्रता परीक्षेत (टीइटी) पुन्हा एकदा गंभीर उदासीनता उघड झाली आहे. सीडीओ मेरी हायस्कूल येथे इंग्रजी माध्यमाच्या परीक्षार्थीना मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळाली.
सकाळी १०.३० ला परीक्षा सुरू झाली. काही वेळातच प्रश्नपत्रिकेतील भाषा चुकीची असल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. विद्यार्थ्यांनी तत्काळ केंद्र प्रशासनासमोर हे प्रकरण मांडले. मात्र, प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. चुकीच्या प्रश्नपत्रिकांची अदलाबदल न करता परीक्षेस प्रवृत्त करण्यात आल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. इतकेच नव्हे, तर अधिकृत वेळ १० ते १ अशी असताना गोंधळामुळे योग्य प्रश्नपत्रिका देण्याऐवजी विद्यार्थ्यांना त्याच प्रश्नपत्रिकेवर परीक्षा लिहावी लागल्याचा आरोप परीक्षार्थीनी केला. या घटनेमुळे भावी शिक्षकांमध्ये मानसिक तणाव वाढला असून, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे पालकांचे मत आहे. ही बाब राज्यातील परीक्षा प्रणालीतील ढिसाळ व्यवस्थापनाचे आणखी एक उदाहरण असल्याचेही मत व्यक्त होत आहे. परीक्षार्थी व पालकांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करत दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. या केंद्रावरील परीक्षेचे पुनर्मूल्यांकन किंवा पुनर्परीक्षा घेण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, असेही मत व्यक्त झाले.
विद्यार्थ्यांचा एकच गोंधळ
सीडीओ मेरी हायस्कूल येथे इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी प्रश्नपत्रिका मिळाल्याने प्रचंड गोंधळ उडाला. विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे चुकीबाबत माहिती दिली, तरी हीच प्रश्नपत्रिका वापरावी असा आग्रह करण्यात आला. परिणामी परीक्षा कशी द्यावी, याबाबत विद्यार्थ्यांची धांदल उडाली. भावी शिक्षकांची नाराजी स्पष्ट दिसून आली.