Kumbh Mela 2026 Pudhari News Network
नाशिक

Simhastha Kumbh Mela | सिंहस्थकामे वेळेत पूर्ण करा; अन्यथा..!

Simhastha Kumbh Mela | महंत संजयदास महाराज यांचा प्रशासनाला इशारा

पुढारी वृत्तसेवा

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थासाठी आखाड्यांची जागा, शेतकऱ्यांना मोबदला, रस्ते, सांडपाणी व्यवस्था, घाट आणि अन्य विकासकामे वेळेत पूर्ण झाली नाहीत, तर कुंभमेळ्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी व इशारा अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते महंत संजयदास महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिला.

निर्मोही, निर्वाणी आणि दिगंबर या तीनही आखाड्यांसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी दिले आहे. मात्र, त्यानुसार लवकरच करार होणार असून आखाड्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष जागेची पाहणी करतील, अशी माहिती महंत संजयदास यांनी दिली. सध्या तीनही आखाड्यांचे मिळून सुमारे १ हजार १० खालसे आहेत.

प्रत्येक कुंभमेळ्यावेळी जागेचा प्रश्न उद्भवू नये, म्हणून आखाड्यांसाठी ९९ वर्षाचा करार करण्यात यावा. कुंभमेळा संपल्यानंतर ही जमीन शेतकऱ्यांना परत करता येईल, अशी भूमिका त्यांनी मांडली. मागील कुंभमेळ्यादरम्यान ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यात आल्या होत्या, परंतु त्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही, तो प्रशासनाने तात्काळ वितरीत करण्यासंदर्भात राज्य सरकारशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शैव-वैष्णव एकत्र

कपिलधारा येथील ध्वजारोहणातही आखाडे सहभागी होणार आहेत. तसेच, गोदावरी आरतीसाठी शैव आणि वैष्णव पंथाचे सर्व आखाडे एकत्र येणार असून, ही अत्यंत आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

वृक्षतोडीस विरोध

गोदावरीत सोडले जाणारे सांडपाणी अन्यत्र वळवून त्याची स्वतंत्र विल्हेवाट लावावी आणि गोदावरीचे पावित्र्य राखावे. तसेच कुंभमेळ्याच्या विकासकामांच्या नावाखाली होणारी वृक्षतोड टाळली पाहिजे, असेही त्यांनी ठोकनावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT