सुळे गाव, सुरगाणा, नाशिक
सुळे गावाला भेट देताना जिल्हाधिकारी जलज शर्मा.  (छाया : प्रशांत हिरे)
नाशिक

Nashik News | 'ग्रामस्थांचा मदतीचा हात तर देईल विकासाला साथ' - जिल्हाधिकारी जलज शर्मा

पुढारी वृत्तसेवा

सुरगाणा : ग्रामस्थांनी शासनाला मदतीचा हात दिला तर खुप मोठे काम होते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सुळे वांगण येथे केले. स्वदेश फाउंडेशनच्या वतीने सुळे गावात विविध विकास कामे सुरु आहेत.

स्वदेश फाउंडेशनच्या सहकार्याने सुळे गावात शेती, शिक्षण, आरोग्य या कामांची पाहणी करण्यासाठी नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा आले होते. यावेळी कळवणचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंह, निवासी नायब तहसिलदार मोहन कुलकर्णी, ग्रामसेवक माधव गावित, तलाठी भोंडवे, आरोग्य विभागाचे जाधव, वनरक्षक अलका भोये, स्वदेश फाउंडेशनचे डायरेक्टर तुषार इनामदार, वरिष्ठ व्यवस्थापक मनोज अहिरे, संकेत तांदळे, तालुका व्यवस्थापक दीपक गिरे, राजेंद्र गुंड, विकास वारघडे, दीपक कदम, वरिष्ठ समन्वयक कल्पना महाले, दीपक मोरे, सत्यवान काळे, सादिक पटेल, विलास पावरा, नितीन डोंगरदिवे, अशोक गोपाळ, तुकाराम बोरसे, अरुण सुगर, निलेश जावळे, सदैव पाटीदार, मयूर गायकवाड, अमित कुलकर्णी, तुषार आमरे, अविनाश नाईक आदी उपस्थित होते.

सुळे गावातील विकास कामांबाबत जलज शर्मा म्हणाले की, जिल्हाधिकारी पदावर काम करणे खुपच कठीण असते. जिल्ह्यात एक हजार चारशे ग्रामपंचायती आहेत. तीन वर्षांच्या कारकिर्दीत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये खूप इच्छा असली तरी फिरणे शक्य होत नाही. ज्या ठिकाणी ग्रामस्थांकडून चांगले काम केले जाते आहे. त्याठिकाणी आवर्जून जायचे ठरविले आणि एक महिन्यापूर्वीच येथील गावात येण्यासाठी पूर्व नियोजन केले होते. परंतु कामात व्यस्त असल्याने वेळेवर येता आले नाही. त्यानंतर ठरवून काहीही झाले तरी सुळे गावात जायचेच अशा निश्चय केला होता. त्यानुसार गुरुवार (दि.२५) रोजी योग आला आणि येथे येणे झाले आहे.

सुळे गावाने शेती, शिक्षण, आरोग्य या बाबतीत अतिशय चांगले काम केले आहे. याचा मला सार्थ अभिमान वाटतो आहे. शासनाच्या माध्यमातून स्वदेश फाउंडेशनच्या वतीने रायगड जिल्ह्यात चांगले काम केले आहे. गावातील लोकांमध्ये मैत्रीची भावना, एकजुट पाहावयास मिळाली. गाव तंटामुक्त आहे. येथील गावाप्रमाणे जर संपूर्ण देशात एकेक गाव, तालुका, जिल्हा, राज्य या दिशेने वाटचाल केली तर राज्य तसेच देशपातळीवर चांगला सन्मान मिळेल. त्यामुळे सुळे हे गाव इतरांना प्रेरणास्थान बनले आहे. याचा तालुक्याला अभिमान वाटला पाहिजे. इतरांना नवीन काहीतरी शिकण्याची भावना गावाने निर्माण केली आहे.

तालुक्यातील कोणतेही एखादे गाव अडचणीत असले तरी तेथील ग्रामस्थांनी असे नवनवीन प्रयोग व श्रमदानाने अडचणीवर मात करता येते हे सुळे गावाने एकजुटीने दाखवून दिले आहे. शंकाचे निराकरण झाले पाहिजे. आरोग्य, शिक्षण यावर भर देणे आवश्यक आहे. स्वदेश फाउंडेशनने संधी दिली आहे. या संधीचे सोने केले पाहिजे. शेतकऱ्यांनी सफेद मुसळी लागवडीचा केलेला प्रयोग हा गाव विकासाला समृद्धीकडे वाटचाल करणारा आहे. येथील गाव व परिसरातील प्रसन्न वातावरण बघून आनंद झाला आहे, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी काढले.

सुळे गावातील ग्रामस्थांकडून छोटेखानी सत्कार स्विकारतांना जिल्हाधिकारी जलज शर्मा.

यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेले आदिवासी नृत्य पाहून जिल्हाधिकारी भारावून गेले. यावेळी प्रगती गाव विकास समितीचे अध्यक्ष पांडुरंग धुम, खजिनदार हिरामण धुम, सचिव चंद्रकला धुम, समितीचे सदस्य विठ्ठल धुम, विलास राऊत, रमेश मेघा, प्रभा गावित, लता गावित, मनोहर खुरकुटे, भीमा पाडवी, मनोहर पाडवी, रमेश धुम, रमेश भुसारे, मंजुळा पवार, सफेद मुसळी प्रगतशील शेतकरी माधव गायकवाड, स्वदेश मित्र जयवंती महाले, पशू मित्र प्रकाश शेवर, एसआरटी सेवक चिंतामण धुम आदी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT