नाशिक : नाशिकरोड येथील माणिक विलास घुले आणि विलास घुले या निवृत्त बँक अधिकारी दांपत्याने आपल्या पेन्शनमधील बचतीतून शेतकरी व पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दहा लाख रुपयांची मदत दिली आहे.
जयशंकर फेस्टिव्हल लॉन्स, तपोवन येथे झालेल्या महानुभाव परिषदेच्या अधिवेशनात घुले दांपत्याने मुख्यमंत्री फडणवीस यांना १० लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
सेवानिवृत्त, दिव्यांग असूनही पेन्शनमधून मदतीचा हात
घुले दांपत्याने डॉ. दिकपाल गिरासे व आरोग्य सेवक दीपक लवटे यांच्या समन्वयाने मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटले आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी दिला. विशेष म्हणजे, माणिक घुले हे पायाने दिव्यांग असूनही त्यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत आपल्या बचतीतून ही मदत केली.