Majhi Ladki Bahin Yojana file photo
नाशिक

CM Majhi Ladki Bahin Yojna: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट, योजनेला मिळाली मुदतवाढ

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'त अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवार (दि. १५)पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अधिकाधिक महिलांनी योजनेत सहभागी होत लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले आहे. (Big update for beloved sisters, scheme got extension)

१५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

मुख्यमंंत्री लाडकी बहीण योजनेला महिलांच्या वाढत्या प्रतिसादामुळे अर्ज दाखल करण्याची तारीख ३१ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र, या मुदतीतही अनेक महिलांनी काही कारणांमुळे अर्ज दाखल केले नव्हते. पण अशा महिलांना आता अर्ज दाखल करण्यासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे

लाडकी बहीण योजनेत सुरुवातीला अर्ज दाखल करण्यासाठी ३१ ऑगस्टची मुदत होती. परंतु, महिलांचा वाढता प्रतिसाद बघता शासनाने ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. त्यानंतर पुन्हा एकदा अर्ज करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी वाढवून दिला होता. योजनेपासून वंचित असलेल्या महिलांनी आपली कागदपत्रे अपलोड करून नाव नोंदवावे, असे आवाहन भुसे यांनी केले आहे.

ज्या महिलांचे आधारकार्ड किंवा अन्य कागदपत्रे नव्हती, अशा महिलांनी योजनेचा अर्ज दाखल केला नव्हता. परंतु आता या महिलांनी आधारकार्ड बँकेशी लिंक केले आहे. अन्य कागदपत्रे जमवली आहेत. त्यामुळे अशा महिलांना नवीन अर्ज दाखल करता येणार आहेत.

मुदत वाढवल्याने लाडक्या बहिणींना मोठा दिलासा

योजनेतील ऑगस्ट महिन्यात दोन हप्ते मिळाले आहेत. तर २९ सप्टेंबरपासून तिसरा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे. पण ज्या लाडक्या बहिणींचे बँकेत खाते नव्हते, ज्या लाडक्या बहिणींचे आधारकार्ड नव्हते किंवा अन्य कागदपत्रे नव्हती, अशा महिलांनी या योजनेचा अर्ज दाखल केला नव्हता. परंतु, आता या लाडक्या बहिणींनी आधारकार्ड बँकेशी लिंक केले आहे. अन्य कागदपत्रे जमवली आहेत, अशा लाडक्या बहिणींना नवीन अर्ज दाखल करता येणार आहेत. मुदत वाढवल्याने लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे. नाशिक जिल्ह्यातदेखील मोठ्या संख्येने लाडक्या बहिणींनी या योजनेत सहभाग घेतला असून, ज्या लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित आहेत अशा लाडक्या बहिणींनी आपले कागदपत्र अपलोड करून नाव नोंदविण्याचे आवाहन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ दिल्यामुळे पालकमंत्री भुसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT