Rash driving
रॅश ड्रायव्हिंग file photo
नाशिक

Nashik | 'हिट अँड रन'च्या घटनांमुळे शहरातील पोलीस 'रॅश ड्रायव्हिंग' विरोधी मोहीमेवर

अंजली राऊत

नाशिक : ऑनलाइन डेस्क - शहर पोलिस, वाहतूक पोलिस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) यांनी शुक्रवार (दि.१२) रोजी पासून शहराच्या हद्दीत बेदरकार आणि मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांना आळा घालण्यासाठी एकत्रित येऊन 'रॅश ड्रायव्हिंग' विरोधातल्या मोहीमेवर प्रयत्न सुरु केले आहेत.

शनिवारी (दि.१३) सायंकाळी शहर पोलिस, वाहतूक पोलिस आणि नाशिक आरटीओचे अधिकारी शहरातील विविध ठिकाणी 'रॅश ड्रायव्हिंग' आणि मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई सुरु केली आहे.

सार्वजनिक मार्गावर 'रॅश ड्रायव्हिंग' करणे हे आयपीसी कलक २७९ नुसार शिक्षेस पात्र असून सार्वजनिक मार्गावर वाहन चालवणे किंवा बेदरकारपणे सायकलिंग करणे किंवा निष्काळजीपणाने वाहन चालवणे जेणेकरुन मानवी जीवन धोक्यात येऊ शकते असे कृत्य गुन्ह्यास पात्र असून त्यास दंडासह सहा महिन्याची शिक्षा होऊ शकते.

शहर परिसरात पोलिसांकडून दररोज सायंकाळी ७ ते १२ या वेळेमध्ये 'रॅश ड्रायव्हिंग' विरोधात मोहीम राबविण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात 'हिट अँड रन'च्या अनेक घटना घडल्या आहेत. मंगळवार (दि.९) रोजी बारदान फाट्याजवळ गंगापूर रोडवर झालेल्या अपघातात पादचारी महिलेला खाली पाडणारा चारचाकी चालकही दारूच्या नशेत वाहन चालवत असल्याचे समोर आले आहे.

गंगापूर रोडवर विशेषत: रात्री ९ वाजेनंतर जेव्हा मोठ्या संख्येने वाहनचालक तुलनेने कमी गर्दीच्या रस्त्यावर बेफामपणे वाहन चालवतात. अशावेळी पोलिसांची गस्त पथके शहराच्या विविध भागात फिरायला हवीत. असे नागरिकांचे म्हणणे आहे.

SCROLL FOR NEXT