Nashik 
नाशिक

Nashik- सिटीलिंकच्या चालकाला मारहाण; चालकांचे आंदोलन, प्रवाशांचे हाल

रिक्षाचालकांवर कारवाईच्या आश्वासनानंतर तीन तासांनी बससेवा पूर्ववत

पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोड - नाशिकरोड बसस्थानक परिसरात शुक्रवारी सकाळी सिटीलिक बसचालकाला रिक्षाचालकांकडून मारहाण झाल्याची घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ सिटीलिक बसचालकांनी अचानक बस बंद आंदोलन पुकारल्याने सकाळी गर्दीच्या वेळी प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. पोलिसांनी मध्यस्थी करत संबंधितांवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर तीन तासांनी बसचा पूर्ववत सुरू करण्यात आली.

सकाळी नऊच्या सुमारास सिटीलिंकची बस स्थानकातून नाशिकरोड ते सिम्बॉयोसिस ही बस बाहेर पडत असताना एका रिक्षाचालकाने बससमोर रिक्षा आयी लावून बस मागे घेण्यास सांगितले. मात्र, बसच्या मागे इतर वाहने असल्याने चालक लक्ष्मण नायका यांना बस मागे घेता येत नव्हती. याच कारणावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर संबंधित रिक्षाचालकाने बसची चावी कावून पेतली. चालक खाली कारताब आणखी दोन-तीन रिक्षाचालकांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला. या मारहाणीत चालक नायकर जखमी झाले.

घटनेनंतर संता बसचालकांनी बस ण्या ठिकाणी होत्या त्या ठिकाणीच उभ्या करत निषेध नोंदवला. त्यामुळे नाशिकरोड वसस्थानक परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली. अनेक बसफेऱ्या ठप्प इवल्याने कामगार, विद्यार्थी, विवाहसमारंभासाठी जाणाऱ्या नागरिकांना मोता मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, गाडेकर मळा येथील सिटीलिंक डेपीमध्ये चालक आणि कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत मारहाणीचा निषेध व्यक्त केला. जोपर्यंत संबंधित रिक्षाचालकांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत बससेवा सुरू करणार नाही, अशी भूमिका चालकांनी घेतली होती.

नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांगी संबंधित रिक्षाचालकांचर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक दिलीप मते, संजय मोरे, विजय गवाते, सुधीर काकड आणि अनिल पवार यांनी बसस्थानक परिसरातील कोंडी मोकळी करण्यासाठी प्रयत्न केले. बससेवा वारंवार बंद पडत असल्याने आणि चालकांवरील हल्ल्यांच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी सिटीलिंक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली, चालकांच्या सुरक्षेसाठी प्रमुख चौकांत सुरक्षा कर्मचारी नेमण्याची मागणीही करण्यात येत आहे

काही रिक्षावालक रस्त्यावर आडव्या रिक्षा लावून दादागिरी 66 करतात. आम्हालाही याचा खूप त्रास होतो. आम्ही स्थानिक रिक्षाचालक संघटना या मारहाणीच्या घटनेचा निषेध करतो, संबंधितांवर कठोर कारवाई - यात्री अभी भालेराव, अध्यक्ष, नालंदा रिक्षास्टँड

वारंवार बसचालकांना मारहाण होते. आम्ही याबाबत 66 प्रशासनाला जाब विचारतो पण प्रशासनाकडून कुठलाही ठोस कारवाई केली जात नाही. त्यामुळे सिटोलिक प्रशासनाने यावर ठोस कारवाई करत बसचालकांना संरक्षण द्यावे. - किरण सांगळे, अध्यक्ष, बसचालक संघटना

संबंचित घटनेत आम्ही चालकासोबत आहोत. याबाबत स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ज्यांनी हे कृत्य केलं त्यांच्यावर योग्य ती पोलिस कारवाई करतील. - राहुल तोर, सिटोलिक महाव्यवस्थापक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT