मंत्री छगन भुजबळांना धमकी देणाऱ्याला अटक file photo
नाशिक

Chhagan Bhujbal | मंत्री छगन भुजबळांना धमकी देणाऱ्याला अटक

गणेश सोनवणे

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क ; राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. भुजबळांना मोबाईलवर आक्षेपार्ह मॅसेज करण्यात आला आहे. नाशिकच्या अंबड पोलिस ठाण्यात धमकी देणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

रवीद्र यशवंत धनक असे धमकी देणाऱ्या संशयिताचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

धमकी देणारा रवीद्र धनक हा नाशिकच्या पाथर्डी फाटा येथील असून त्याला पोलिसांनी बीड जिल्ह्यातील नगर आष्टी रोड येथून ताब्यात घेतले.

यापूर्वीही छगन भुजबळ यांना धमकीचे फोन आलेले आहेत. त्यापार्श्वभूमीवर अनेकदा त्यांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढविण्यात आली होती. त्यात मराठा आरक्षणासंदर्भात भुजबळांनी घेतलेल्या भूमिकेमुळेही त्यांना धमक्या आलेल्या आहेत. त्यात विधानसभेच्या तोंडावर आता पुन्हा एकदा भुजबळांना धमकी आल्याने खळबळ उडाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT